यात्रेत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या टोळीला अटक File Photo
पुणे

Otur News : यात्रेत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या टोळीला अटक

ओतूर पोलिसांची कारवाई, ४ लाख १० हजार रुपयांचा ऐवज जप्त

पुढारी वृत्तसेवा

Gang arrested for stealing women's jewellery during pilgrimage

ओतूर : पुढारी वृत्तसेवा

यात्रेत दागिने चोरणारी टोळी ओतूर(ता.जुन्नर) पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील मुक्तादेवी यात्रेमध्ये महिलेचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी झाले. पिंपरी पेंढारच्या स्थानिक ग्रामस्थांनी काही महिला तसेच पुरुषांना चोरी करताना रंगेहात पकडले.

या विषयी ग्रामस्थांनी फोन करून ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांना दिली. त्यांनी तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी पाठवून गावकऱ्यांनी पकडून ठेवलेल्या संबंधित संशयित महिला तसेच एक पुरुष यांना ओतूर पोलीस स्टेशनला आणले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्‍यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

२४ एप्रिल रोजी पिंपरी पेंढार येथील यात्रेत हा प्रकार घडला असून, सुरेश गौतम चव्हाण, योगिता गणेश पवार, माया दुर्वेश पवार (सर्व रा. इमामपूर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी या दागिने चोरांची नावे आहेत.

दागिन्यांची मालक असलेल्या संबंधित महिलेने ओतूर पोलिसात या टोळीविरुद्ध तक्रार दाखल केली असून, तिचे एकूण दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र अंदाजे किंमत १ लाख ६० हजार रुपये किमतीची चोरी झाली. याबाबत ओतूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.

ओतूर पोलिसांनी तीनही आरोपींना जुन्नर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक चौकशीत या टोळीने मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली आहे. चोरी केलेले मंगळसूत्र देखील त्यांनी पोलिसांना दिले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती अल्टो कार नंबर ( एम. एच. २० ए. जी. ९२०६) अंदाजे किंमत २ लाख ५० हजार ही जप्त करण्यात आलेली असून, दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र अंदाजे किंमत १ लाख ६० हजार रुपये असा एकूण ४ लाख १० हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रवींद्र चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे, उपनिरीक्षक युवराज जाधव, संदीप आमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिनेश साबळे, सुरेश गेंगजे, नामदेव बांबळे, महेश पठारे, भरत सूर्यवंशी, धनंजय पालवे, पोलीस अंमलदार ज्योतीराम पवार, विश्वास केदारी, पोलीस मित्र शंकर अहिनवे, सचिन पानसरे यांनी केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार दिनेश साबळे, महिला पोलीस अंमलदार मयुरी खोसे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT