Baramati Court Verdict | बारामती न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल : दौंड येथील विनोद नरवार खूनप्रकरणी १२ जणांना जन्मठेप

Vinod Narwar Murder Case | ३ महिलांसह ४ सख्ख्या भावांना शिक्षा
Court Verdict
प्रातिनिधिक छायाचित्र(File Photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आज खून खटल्यात ऐतिहासिक निकाल देत ४ सख्खे भाऊ, ३ महिलांसह १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

दौंड येथील विनोद नरवार यांची ३ मे २०१८ रोजी हत्या झाली होती. विनोद नरवाल त्यांच्या दुचाकीवरुन निघाले असताना अनोळखी लोकांनी तलवार, कोयता, लोखंडी पाईप, काठ्या, फरशीचे तुकडे, दगडांनी बेदम मारहाण केली. फिर्यादी व विनोद यांच्या पत्नी मीना नरवाल यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रूग्णालयात नेताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दौड पोलिसांत १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती एस.आर. पाटील यांच्या समोर हा खटला चालला. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले. ८ साक्षीदारांची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पुरावे व न्यायवैदयकीय पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने १२ जणांना जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या दंडाची ५ लाखांची रक्कम मीना नरवाल यांना देण्याचेही आदेश न्यायालयाने दिलेले आहेत.

Court Verdict
Baramati Fire News : बारामती एमआयडीसीत स्क्रॅपच्या गोडाऊनला आग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news