टीओडी मीटरच्या खर्चाचा भार ग्राहकांवर नाही; अफवांना बळी न पडण्याचे महावितरणचे आवाहन

वीजबिलावर राहणार नियंत्रण
Baramati
टीओडी मीटरच्या खर्चाचा भार ग्राहकांवर नाही; अफवांना बळी न पडण्याचे महावितरणचे आवाहन File Photo
Published on
Updated on

बारामती: महावितरणमार्फत बसवण्यात येणार्‍या टीओडी (टाइम ऑफ डे) मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीजवापराची माहिती दर तासानुसार (रियल टाइम) उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहकांचे वीजवापरावर व पर्यायाने वीजबिलावर नियंत्रण राहणार आहे. तसेच, अचूक व वेळेत बिल मिळणार आहे.

टीओडी मीटर हे पोस्ट पेड असून, मीटर रीडिंगनुसारच त्याचे बिल देण्यात येणार आहे. ग्राहकांवर कोणताही खर्चाचा भार न टाकता बसवण्यात येणारे टीओडी मीटर हे ग्राहकांच्या फायद्याचेच आहे. ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. (Latest Pune News)

Baramati
Manchar Crime: सोनवणेंच्या खुनामुळे दिव्यांगांच्या मनात भीती

बारामती परिमंडलात सध्या नवीन वीजजोडणीकरता देखील टीओडी मीटर वापरण्यात येत आहेत. टीओडी मीटर बसवण्याच्या करारानुसार ठेकेदाराने मीटर बसवून या मीटरची देखभाल दहा वर्षे करायची आहे. मात्र, काही भागांत गैरसमजातून ग्राहक उपयोगी टीओडी मीटरला विरोध केला जात आहे. हा विरोध निराधार असून, ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सदर अद्ययावत मीटर बसविल्याने महावितरणची वाणिज्यिक हानी कमी होणार आहे. तसेच, वीजचोरीवर नियंत्रण येणार आहे. यातून होणार्‍या महसूलवाढीतूनच टीओडी मीटरचा खर्च केला जाणार आहे.

Baramati
राजगुरुनगरमध्ये मुस्लिम बांधवांकडून पहलगाम घटनेचा निषेध

स्वस्त दरात वीज

राज्यात सुरू असणार्‍या रूफ टॉप सोलर, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी योजनांमुळे दिवसा स्वस्त दरात वीज उपलब्ध होत आहे. भविष्यात दिवसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारी वीज वापरली जावी, यासाठी औद्योगिक ग्राहकांच्या धर्तीवर घरगुती ग्राहकांनाही दुपारच्या वेळी वीज दरात सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाकडे

सादर केला आहे. सध्या बसवण्यात येणार्‍या मीटरमध्ये टीओडी ही सुविधा उपलब्ध असून, ग्राहकांना स्वस्त वीज दराचा फायदा होणार आहे. जुन्या मीटरमध्ये टीओडी ही सुविधा नसल्याने ग्राहकांना दिवसा स्वस्त वीज दराचा फायदा मिळू शकणार नाही.

पारदर्शी सुविधा

टीओडी मीटरमधून वापरल्या जाणार्‍या प्रत्येक युनिटची रिअल टाइम माहिती ही ग्राहकास मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वीजवापरानुसार रीडिंग येत नसेल, तर ग्राहकास हे कळणार आहे. बसवण्यात येणारे टीओडी मीटर हे राष्ट्रीय मानांकन प्राप्त लॅबमधून चाचणी केलेले असल्याने ग्राहकांना वापरा इतकेच वीजबिल मिळणार आहे. अत्यंत नावीन्यपूर्ण अशी पारदर्शी सुविधा वीज ग्राहकांना नव्या टीओडी मीटरमुळे मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news