पुणे : जनतेच्या मदतीसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या गणेश बिडकर यांनी त्यांच्या प्रभागात सुरू केलेल्या महा ई-सेवा केंद्राचा लाभ आजवर २७,००० नागरिकांना झाला असल्याची माहिती बिडकर यांच्या प्रचारयंत्रणेतील कार्यकर्त्यांनी दिली. घरटी किमान एक लाभार्थी असल्याने बिडकर यांच्या जनसंपर्क मोहिमेदरम्यान जवळपास प्रत्येक जण त्यांचे आभार मानताना पाहायला मिळत आहे.
पुणे महापालिकेसह केंद्राच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा, विविध शासकीय कागदपत्रे मिळावीत, यासाठी बिडकर यांच्या पुढाकाराने सोमवार व रास्ता पेठ येथे महा ई-सेवा केंद्रे सुरू केली गेली. या ई-सेवा केंद्रात उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रेशन कार्ड, जातीचा दाखला यांसारखी कागदपत्रे नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जातात.
नागरिकांना या सुविधा पुरवण्याचे विशेष प्रशिक्षण 'टीम बिडकर'ला देण्यात आले आहे. या ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत ७ हजार दाखले, ४ हजार १७४ आधार कार्ड, ४ हजार शहरी गरीब कार्ड, ४ हजार ४२९ मतदान ओळखपत्र, १ हजार ८०० ई-श्रम कार्डचे वितरण करण्यात आले आहे. या ई-सेवा केंद्रामुळे विविध सरकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळते. प्रशासन आणि सर्वसामान्य यांना जोडणाऱ्या दुव्याचे काम हे महा ई-सेवा केंद्र करत आहे. या केंद्राचा लाभ अधिकाधिक नागरिकांना घ्यावा, असे आवाहन गणेश बिडकर यांनी केले आहे.
एकूण लाभार्थी – २७,०००+
दाखले – ७,०००
आधार कार्ड – ४,१७४
शहरी गरीब कार्ड – ४,०००
मतदान ओळखपत्र – ४,४२९
ई-श्रम कार्ड – १,८००