पुणे

पुणे विमानतळावर दीड कोटींचे परकीय चलन जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई

अमृता चौगुले

पुणे : केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या पथकाने पुणे विमानतळावर चार जणांना ताब्यात घेत दीड कोटींचे परकीय चलन जप्त केले आहे. प्रोफाइलिंगच्या आधारे दोन वेगवेगळ्या प्रकरणात हे परकीय चलन जप्त करण्यात आले.

सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २५ जुलै रोजी पुण्याहून दुबईला जाणाऱ्या एका प्रवाशाला ताब्यात घेत त्याच्याकडून 9,22,000 रुपये किमतीचे संयुक्त अरब अमिराती दिरहम (AED) हे विदेशी चलन जप्त करण्यात आले.

तर दुसऱ्या एका प्रकरणात ३१ जुलै रोजी दुबईला जाणाऱ्या तीन प्रवाशांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 1,41,11,578 किमतीचे संयुक्त अरब अमिराती दिरहम चलन जप्त करण्यात केले. या सर्व प्रवाशांनी परवानगीच्या मयदिपेक्षा जास्त परकीय चलन स्वतः जवळ बाळगल्याने ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT