पुणे

पुणे : दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना बेड्या

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

धारदार हत्यारांच्या साहाय्याने हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळक्याला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडील तपासणीत 2 लाख 2 हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले.

याप्रकरणी अभिजीत उर्फ भुर्‍या बाळू शिंदे (19, रा. गणेशनगर, मंतरवाडी, हडपसर, पुणे), आकाश रामहरी हजगुडे (21, रा. फुरसुंगी), आशिष मारूती धनके (22, रा. फुरसुंगी) या तीन सराईतांसह निखील रत्नघोष वासनिक (28, रा. बीगमार्ट जवळ, पुणे)आणि प्रणव महादेव शिंदे (19, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस हवालदार प्रदिप विजय सोनवणे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाचही जणांना जुन्या फुरसुंगी रोडवरील कॅनॉलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतून पहाटे साडेचार वाजता अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडे कोयता, कटावणी, नायलॉनची दोरी, स्क्रु ड्रायव्हर, बोअर कटर, एक्सा ब्लेड, मिरची पावडर, लोखंडी पक्कड तसेच तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT