Fish  Pudhari
पुणे

Pune Fish Market Rates: मासेमारी बंदीची चाहूल; पुण्यात मासळीचे दर तेजीत, काही प्रकारांना दुप्पट भाव

गणेश पेठ बाजारातील आवक घटली; पावसाळ्यापूर्वी मागणी वाढण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर येत्या एक जूनपासून मासेमारी बंदी लागू होत असल्याने बोटी किनाऱ्यावर परतू लागल्या आहेत. तर, पूर्व किनारपट्टीवरील बंदी अद्याप कायम असल्याने गणेश पेठ येथील मासळी बाजारात मासळीची आवक घटली आहे. त्यातुलनेत मागणी चांगली असल्याने मासळीचे तेजीतील दर टिकून आहेत.

तर, काही प्रकारांना नेहमीपेक्षा दुप्पट भाव मिळत आहे. सध्या उष्णतेमुळे मागणी मर्यादित असली, तरी पावसाळा सुरू झाल्यानंतर मासळीच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मागणी आणि पुरवठा यांचा समतोल कायम असल्याने मटण, चिकन आणि गावरान अंड्यांचे दर स्थिर आहेत. मात्र, इंग्लिश अंड्यांच्या भावात शेकड्यामागे 25 रुपयांची वाढ झाली आहे.

घाऊक बाजारात रविवारी (दि. 24) खोल समुद्रातील मासळी 10 ते 15 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200 ते 300 किलो आणि नदीच्या मासळीची 700 ते 800 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकुर परदेशी, चिकनचे विक्रेते रुपेश परदेशी आणि मटण विक्रेते संघटनचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : 2000-2500, मोठे : 1700-2000, मध्यम : 1500-1700, लहान : 1100-1300, भिला : 1000-1200, हलवा : 900-1000, सुरमई 1000-1400, रावस : 950-1200, घोळ : 900-1000, करली : 400-450, करंदी (सोललेली) : 450-550, भिंग : 500-550, पाला : 1000-1500, वाम : पिवळी 900-1200, काळी : 500-600, ओले बोंबील : 400-480. कोळंबी : लहान : 250-320, मध्यम : 350-550, मोठी : 600-700, जम्बो प्रॉन्स : 1500-1600, किंग प्रॉन्स : 800-900, लॉबस्टर : 2000-2500, मोरी : 400-450, मांदेली : 140-180, राणीमासा : 250-320, खेकडे : 350-450, चिंबोऱ्या : 550-750.

खाडीची मासळी - सौंदाळे : 280-320, खापी : 280-320, नगली : 500-600, तांबोशी : 600-650, पालू : 400-450, लेपा : 250-350, बांगडा : 250-350, शेवटे : 300-350, पेडवी : 150-200, बेळुंजी : 150-200, तिसऱ्या : 250-350, खुबे : 150-200, तारली : 200-250. नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 180-250, मरळ : 350-450, शिवडा : 200-250, खवली : 250-300, आम्ळी : 160-200, खेकडे : 250-400, चिलापी : 80-180, वाम : 550-600. मटण : न्बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 240, लेगपीस 290, जिवंत कोंबडी 180, बोनलेस 340. अंडी : गावरान (शेकडा) 1100 डझन 140, प्रतिनग 12. इंग्लिश (शेकडा) 600, डझन 84, प्रतिनग 7.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT