Kalyan Ahilyanagar Highway Accident: कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी बसच्या धडकेत चार युवकांचा जागीच मृत्यू

डिंगोरे परिसरात भरधाव एसटीने दुचाकीला समोरासमोर धडक; गावावर शोककळा
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

ओतूर: कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर डिंगोरे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत हॉटेल जीवनदीप समोर रविवारी (दि. २४) रात्री ८ ते ९ वाजेच्या भीषण अपघात झाला. या अपघातात चार दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.

Accident
NEET UG 2026 Refund Process: NEET UG 2026 परीक्षेचे शुल्क परतावा सुरू; उमेदवारांसाठी NTA ची विशेष सुविधा उपलब्ध

हे चारही युवक डिंगोरे (ता. जुन्नर ) येथील आहेत. त्यांची नावे आशिष ढवळू भले, दीपक सखाराम भले (दोघेही रा. मराडवाडी डिंगोरे), शिवराम नारायण पारधी आणि खंडू नारायण भले (दोघेही रा. आंबेदरा, डिंगोरे, ता. जुन्नर) अशी आहेत.

Accident
Maharashtra District Sports Officer Recruitment: जिल्हा क्रीडाधिकारी भरतीत मोठा बदल; आता थेट नियुक्तीऐवजी पदोन्नतीनेच भरती प्रक्रिया

कल्याणहून ओतूरच्या दिशेने येणाऱ्या विठ्ठलवाडी-पाथर्डी या एसटी बसने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडल्याची माहिती ओतूर पोलिस सूत्रांनी दिली. तर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस चालकाने महामार्गावर भरधाव वेगात बस चालवत पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.

Accident
Maharashtra ITI Admission 2026: आयटीआय प्रवेश प्रक्रियेला जोरदार प्रतिसाद; तीन दिवसांत 20 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

यावेळी बस चालकाने पूर्णपणे डावी लेन सोडून उजव्या बाजूच्या लेनमध्ये प्रवेश केल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला.

Accident
CET Objection PCB Law 2026: सीईटी सेलचा विद्यार्थ्यांना इशारा; पीसीबी व लॉ CET उत्तरांवर आक्षेप नोंदविण्याची संधी सुरू

या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांनी एसटी बसचालकाच्या बेदरकार वृत्तीवर संताप व्यक्त केला आहे. निष्काळजीपणे व वेगाने वाहन चालवल्यामुळे निष्पाप चार जणांना जीव गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news