Maharashtra ITI Admission 2026: आयटीआय प्रवेश प्रक्रियेला जोरदार प्रतिसाद; तीन दिवसांत 20 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

ऑगस्ट 2026 सत्रासाठी राज्यभर 1.57 लाख जागा; इलेक्ट्रिशियन ट्रेडला सर्वाधिक मागणी
Admission
AdmissionPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) ऑगस्ट 2026 सत्राच्या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत 20 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या माहितीनुसार, शनिवारी ( दि. 23) सायंकाळी सहा वाजेपर्यंत 20 हजार 700 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 17 हजार 46 विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे, तर 1 हजार 441 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केली आहे.

Admission
CET Objection PCB Law 2026: सीईटी सेलचा विद्यार्थ्यांना इशारा; पीसीबी व लॉ CET उत्तरांवर आक्षेप नोंदविण्याची संधी सुरू

राज्यातील 418 शासकीय आणि 586 खासगी अशा एकूण 1 हजार 4 आयटीआय संस्थांमध्ये यंदा 1 लाख 57 हजार 664 जागांवर प्रवेश होणार आहे. यासाठी गुरुवारपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर अर्ज भरता येत आहेत. अर्ज भरणे, शुल्क भरणे, कागदपत्रे पडताळणी आणि प्रवेशनिश्चितीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

Admission
Pune Police Crackdown: बालाजीनगर हल्ल्यानंतर पुण्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त; सर्वसामान्य व्यावसायिकांना फटका

पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय पर्याय आणि प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू होणार आहे. दहावीच्या गुणपत्रिका वितरित झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संचालनालयाने दिली आहे. प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 150 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये, राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी 300 रुपये, तर अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

Admission
Pune Water Theft 24x7 Scheme: 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेवर पाणीचोरांचा डल्ला; मुख्य जलवाहिनी फोडून अनधिकृत नळजोडीचा प्रकार उघड

सर्वाधिक जागा ‌‘इलेक्ट्रिशियन‌’ या ट्रेडसाठी...

यंदा सर्वाधिक जागा ‌‘इलेक्ट्रिशियन‌’ या ट्रेडसाठी उपलब्ध असून, तब्बल 25 हजार 140 जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. त्याखालोखाल ‌‘फिटर‌’ ट्रेडमध्ये 23 हजार 420, ‌‘वेल्डर‌’मध्ये 17 हजार 340, ‌‘कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग््राामिंग असिस्टंट‌’मध्ये 10 हजार 824, तर ‌‘मेकॅनिक डिझेल‌’मध्ये 8 हजार 64 जागा उपलब्ध आहेत. कौशल्याधारित अभ्यासक्रमांना वाढती मागणी लक्षात घेता विद्यार्थ्यांचा कल यंदाही पारंपरिक आणि तांत्रिक ट्रेडकडे असल्याचे दिसून येत आहे.

Admission
Cockroach Janta Party Fraud: कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने ऑनलाईन फसवणूक; बनावट लिंकपासून सावध राहा!

...अशा आहेत उपलब्ध जागा

  • पुणे विभागात सर्वाधिक: 31 हजार 528

  • नाशिक विभागात: 30 हजार 668

  • नागपूर विभागात: 29 हजार 176

  • पुणे जिल्ह्यात सर्वाधिक: 12 हजार 452 जागा

  • नागपूर जिल्ह्यात: 10 हजार 96

  • जळगाव जिल्ह्यात: 10 हजार 436

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news