पिंपरी(पुणे) : मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी जात असलेल्या तरुणाची दुचाकी देखील चोरट्यांनी पळवून नेली. हा प्रकार 20 जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास भोसरी येथे घडला. सोमनाथ प्रकाश वाघ (29, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी सोमनाथ हे पीएमटी चौक, भोसरी येथे असताना आरोपीने त्यांच्याकडे मोबाईल मागितला. फिर्यादी यांनी विश्वासाने आरोपीला मोबाईल दिला. मात्र, आरोपीने गर्दीचा फायदा घेत मोबाईल घेऊन पळ काढला. तसेच, फिर्यादी यांच्या मोबाईलमधून तीन हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून जात होते.
दरम्यान, पुणे- नाशिक महामार्गावरील साई सागर हॉटेल, भोसरी येथे अनोळखी व्यक्तीला त्यांनी भोसरी पोलिस ठाण्याचा पत्ता विचारला. त्यावर दुसर्या अनोळखी व्यक्तीने पोलिसांना सांगून तुला मदत करायला सांगतो, असे म्हणत फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.तसेच त्यांची दुचाकी घेऊन पळ काढला.
हेही वाचा