कोल्हापूर : बालिंगे पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू | पुढारी

कोल्हापूर : बालिंगे पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू

कोल्हापूर/ दोनवडे; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर- गगनबावडा मार्गावर दोनवडे ते बालिंगे दरम्यान बंद केलेला रस्ता गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास सुरू झाला. बालिंगे पुलाला धोका असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केली होती. पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी यांनी झालेल्या बैठकीत हा मार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला. तसे आदेश पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर हा मार्ग दुपारी अडीच वाजता खुला झाला.

दरम्यान, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अपेक्षित पाणी पातळी गाठलेली नाही. ती स्थिर राहिल्याने स्थलांतरित केलेल्या लोकांना शुक्रवारपासून पुन्हा स्वगृही पाठवण्यात येणार आहे. तसेच पाणी पातळी पुन्हा वाढल्यास नागरिकांचे स्थलांतर केले जाणार आहे. जिल्ह्यात सुट्टी दिलेल्या सर्व शाळा शुक्रवारपासून पूर्वत सुरू राहतील, असेही पालकमंत्री केसरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Back to top button