पुणे

न्यायालयातील अग्निसुरक्षा रामभरोसे; एक्सटिंगविशर रिफिलिंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिवाजीनगर येथील दिवाणी, फौजदारीसह कौटुंबिक न्यायालयाची अग्निसुरक्षा मुदतबाह्य फायर एक्सटिंगविशरमुळे धोक्यात आली आहे. मुदत संपून चाळीस दिवस होऊनही एक्सटिंगविशर रिफिलिंग न झाल्याने भविष्यात आगीसारखी दुर्घटना घडल्यास अनेक महत्त्वाच्या खटल्यांमधील कागदपत्रे जळून त्याचा फटका पक्षकारांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापुर्वी आगीच्या दोन घटना घडूनही अग्निसुरक्षेबाबत काळजी घेतली जात नसल्याने न्यायालयीन कामकाजासाठी येणारे पक्षकार आणि वकिलांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

हेरिटेज वास्तू तसेच अनेक महत्त्वाच्या खटल्यांच्या कागदपत्रांचे भांडार असलेल्या शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात एक नवीन, तर तीन जुन्या दगडी इमारती आहेत. त्यापैकी जुन्या इमारतींमध्ये लुघवाद व दिवाणी न्यायालय, नाझर, तांत्रिक विभाग, ग्रंथालय, राजपत्रित अधिकारी विभाग, अपिलिय अधिकारी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे कार्यालय यांसह विविध विभाग आहे. त्याअनुषंगाने याठिकाणी साधारण पाच ते सहा किलो वजनाचे एक्सटिंगविशर (आग प्रतिबंधक उपकरण) लावण्यात आले आहे. प्रत्यक्षात आवश्यक असलेल्या एक्सटिंगविशरपेक्षा लावण्यात आलेल्या एक्सटिंगविशरची संख्या अत्यंत कमी तेही मुदतबाह्य झाले आहेत. याखेरीज, नवीन इमारतीत अग्निशामक यंत्रणाही बसविण्यात आली आहे. मात्र, त्यातील बहुतांश फायर होस बॉक्स हे रिकामे असून, त्यातील पाईपही गायब झाले.

शिवाजीनगर येथील दिवाणी, फौजदारीसह कौटुंबिक न्यायालयाची अग्निसुरक्षा मुदतबाह्य फायर एक्सटिंगविशरमुळे धोक्यात आली आहे. मुदत संपून चाळीस दिवस होऊनही एक्सटिंगविशर रिफिलिंग न झाल्याने भविष्यात आगीसारखी दुर्घटना घडल्यास अनेक महत्त्वाच्या खटल्यांमधील कागदपत्रे जळून त्याचा फटका पक्षकारांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापुर्वी आगीच्या दोन घटना घडूनही अग्निसुरक्षेबाबत काळजी घेतली जात नसल्याने न्यायालयीन कामकाजासाठी येणारे पक्षकार आणि वकिलांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
हेरिटेज वास्तू तसेच अनेक महत्त्वाच्या खटल्यांच्या कागदपत्रांचे भांडार असलेल्या शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात एक नवीन, तर तीन जुन्या दगडी इमारती आहेत.

त्यापैकी जुन्या इमारतींमध्ये लुघवाद व दिवाणी न्यायालय, नाझर, तांत्रिक विभाग, ग्रंथालय, राजपत्रित अधिकारी विभाग, अपिलिय अधिकारी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे कार्यालय यांसह विविध विभाग आहे. त्याअनुषंगाने याठिकाणी साधारण पाच ते सहा किलो वजनाचे एक्सटिंगविशर (आग प्रतिबंधक उपकरण) लावण्यात आले आहे. प्रत्यक्षात आवश्यक असलेल्या एक्सटिंगविशरपेक्षा लावण्यात आलेल्या एक्सटिंगविशरची संख्या अत्यंत कमी तेही मुदतबाह्य झाले आहेत. याखेरीज, नवीन इमारतीत अग्निशामक यंत्रणाही बसविण्यात आली आहे. मात्र, त्यातील बहुतांश फायर होस बॉक्स हे रिकामे असून, त्यातील पाईपही गायब झाले.

इमारत एक्सटिंगविशरची संख्या (जवळपास)

  • दिवाणी न्यायालय 4 ते 5
  • जिल्हा न्यायालय 7 ते 8
  • लघुवाद न्यायालय 4 ते 5
  • नवीन इमारत 15 ते 20

भविष्यात आगीसारखी समस्या उद्भवल्यास त्याचा दाव्यांच्या सुनावणीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, प्रशासनाला सर्वांची फेरसुनावणी घेण्याची वेळ येईल. यासाठी दाव्यांतील वकील, वादी आणि प्रतिवादींना पुन्हा एकदा सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करावी लागतील. दाव्यांबाबत मूळ कागदपत्रे मिळविताना त्याचा त्रास पक्षकारांना सहन करावा लागेल.

– अ‍ॅड. अजिंक्य मिरगळ

न्यायालयातील अग्नि सुरक्षेकडे दुर्लक्ष होणे ही चिंताजनक गोष्ट आहे. सत्र न्यायालयाच्या आवारात आत्तापर्यंत दोन आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे, प्रशासनाने अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. न्यायालयातील अनावश्यक साहित्य हलविण्याची आवश्यकता असून, कागदपत्रांचे डिजिटायझेन होण्याचीही आवश्यकता आहे.

– अ‍ॅड. मोनिका गावडे-खलाने

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT