Uttarakhand | हल्दवानीत हिंसाचार, ४ ठार, १०० हून अधिक पोलिस जखमी | पुढारी

Uttarakhand | हल्दवानीत हिंसाचार, ४ ठार, १०० हून अधिक पोलिस जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील हल्दवानी येथील बनभुलपुरा भागात गुरुवारी (दि.८) झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत  4 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. (Uttarakhand)

Uttarakhand | काय आहे प्रकरण?

माहितीनुसार, उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील हल्दवानी येथील बनभुलपुरा भागात गुरुवारी (दि.८) हल्दवणी येथील बनभुळपुरा भागात महापालिकेने जेसीबी मशिन लावून बेकायदा मदरसा व नमाजची जागा जमीनदोस्त केली. बेकायदा मशीद व मदरशावर प्रशासनाचा बुलडोझर फिरताच तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त जमावाने अनेक वाहने पेटवून दिली. तसेच जेसीबीचीही तोडफोड केली. यानंतर परिसरात निर्माण झालेली हिंसक परिस्थिती पाहता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

कबर बेकायदेशीर होती?

मदरसा आणि नमाजाची जागा पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे महापालिका आयुक्त पंकज उपाध्याय यांनी म्हटले आहे. बेकायदेशीर मदरसा आणि नमाजची जागा सील करण्यात आली होती आणि ती आता पाडण्यात आली आहे. या काळात सिटी मॅजिस्ट्रेट रिचा सिंग, एसडीएम परितोष वर्मा आणि वनभुलपुराचे एसओ नीरज भाकुनी यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या हिंसक घटनेनंतर हल्द्वानीमध्ये तणावाचे वातावरण आहे. पोलिस दलाची सतत गस्त सुरू आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या गेल्या.

काय म्हणाले सीएम धामी?

हल्दवानीच्या बनभुलपुरा भागात झालेल्या हिंसाचारावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाची एक टीम अतिक्रमणविरोधी मोहिमेसाठी गेली होती. तेथे जमावाचा पोलिसांशी वाद झाला. काही पोलीस कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी जखमी झाले. पोलिस आणि केंद्रीय दल तेथे पाठवल्या जात आहेत. आम्ही सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कर्फ्यू जागोजागी आहे. जाळपोळ करणाऱ्या दंगलखोर आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

Back to top button