पुणे

येरवडा मेट्रो स्थानक परिसरातून पीएमपी, एसटीची फीडर सेवा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : येरवडा मेट्रो स्थानकाजवळील महापालिकेच्या (वॉर्ड ऑफिसच्या बाजूच्या) जागेत पीएमपी आणि एसटीला बस उभ्या करण्यासाठी जागा देण्यात येणार आहे आणि तेथूनच विमान प्रवाशांसाठी पीएमपीची आणि इतर लांबच्या प्रवाशांसाठी एसटीची फीडरसेवा सुरू करण्यात येणार आहे. येरवडा मेट्रो स्थानकापासून पुणे विमानतळ सुमारे 4.8 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे येरवडा मेट्रो स्थानक ते विमानतळ अशी फिडर बससेवा पीएमपीच्या सहकार्याने चालविण्यात येणार आहे. विमानतळ विशेष फिडर बस थांबण्यासाठी येथे दोन 'बस बे'चे नियोजन करण्यात आले आहे.

त्यामुळे प्रवाशांना मेट्रोमधून उतरल्यावर लगेचच विमानतळ बस असेल. त्यासोबतच येरवडा मेट्रो स्थानक हे पुणे-नगर या राष्ट्रीय महामार्गावर असून, तेथे वाहनांची निरंतर वाहतूक सुरू असते, त्यामुळे येथून लांबच्या प्रवाशांसाठी एसटीला थांबा देण्यात येणार आहे. जेणेकरून मेट्रोतून उतरल्यावर प्रवाशांना थेट महामार्गानेदेखील प्रवास करता येणार आहे.

रुबी हॉल ते रामवाडीमार्ग लवकरच खुला

पुणे मेट्रो प्रकल्पातील रुबी हॉल ते रामवाडी या मार्गिकेवरील स्थानकांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. उर्वरित कामे पूर्ण करून हा मार्ग प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पुणे मेट्रो आणि पुणे मनपा यांच्या संयुक्त नियोजनाने येरवडा स्थानकाचा आराखडा बनविला आहे. त्यामुळे रस्त्यावरची कोंडी कमी होणार आहे. तसेच, येरवडा स्थानक वापरणार्‍या प्रवाशांना मल्टी मॉडेल इंटिग्रेशनचा फायदा होणार आहे. त्यासोबतच फीडर सेवेमुळे विमानतळासाठी कनेक्टिव्हिटी सुधारून प्रवास जलद होणार आहे.

श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT