वयाच्या 116 व्या वर्षी जपानी महिलेचे निधन | पुढारी

वयाच्या 116 व्या वर्षी जपानी महिलेचे निधन

टोकियो : जपानमध्ये दीर्घायुष्यी लोकांची संख्या मोठीच आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात वृद्ध महिला असा लौकिक असणार्‍या एक आजीबाईही जपानच्याच होत्या. त्यांचे नाव फुसा तात्सुमी. त्या जपानमधील सर्वात वृद्ध महिला होत्या. मंगळवारी म्हणजेच 12 डिसेंबरला त्यांचे वयाच्या 116 व्या वर्षी निधन झाले. त्यांचा जन्म 25 एप्रिल 1907 मध्ये झाला होता.  (Oldest Person in Japan Dies at Age 116 )

फुसा या 116 वर्षे जगणार्‍या जगातील 27 व्या आणि जपानमधील सातव्या व्यक्ती होत्या. स्पेनच्या मारिया ब्रान्यास मोरेरा यांच्यानंतर त्या जगातील सर्वात वृद्ध महिला ठरल्या होत्या. जपानच्या ओसाका शहरातील एका हेल्थकेअर सेंटरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यांचा आवडीचा पदार्थ बीन पेस्ट जेली खाल्ल्यानंतरच त्यांनी प्राण सोडला. फुसा यांनी आपल्या दीर्घायुष्यात दोन महायुद्धे पाहिली. तसेच अनेक महामारीही त्यांनी पाहिल्या होत्या. या सर्व संकटांना तोंड देऊन त्या दीर्घकाळ जिवंत राहिल्या. सध्या मारिया या स्पेनमध्ये राहणार्‍या अमेरिकन महिला सर्वात वृद्ध महिला ठरलेल्या आहेत. त्यांचा जन्म 4 मार्च 1907 मध्ये झाला आहे.

हेही वाचा : 

Back to top button