QR Code : तीन हजार वर्षांपूर्वीच्या मूर्तीत ‘क्यूआर कोड?’ | पुढारी

QR Code : तीन हजार वर्षांपूर्वीच्या मूर्तीत ‘क्यूआर कोड?’

वॉशिंग्टन : सध्या ऑनलाईन पेमेंटचा जमाना आहे आणि त्यासाठी क्यूआर कोड स्कॅन केला जात असतो. असा क्यूआर कोड तीन हजार वर्षांपूर्वीच्या एखाद्या मूर्तीमध्ये पाहायला मिळेल याची आपण कल्पनाही करणार नाही. मात्र, सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये डोक्याच्या जागी ‘क्यूआर कोड’सारखी रचना असलेली एक मूर्ती पाहायला मिळते. ही मूर्ती तीन हजार वर्षांपूर्वीची आणि माया संस्कृतीमधील असल्याचे म्हटले जाते.

काही प्राचीन मूर्तींमध्ये मोबाईल आणि लॅपटॉपचाही भास होत असल्याचे यापूर्वी दिसून आले होते. त्यामुळे प्राचीन लोकांना भविष्याचा अंदाज घेता येत होता का, प्राचीन काळातही आधुनिक उपकरणांसारखी साधने होती का, याबाबत अनेकांनी चर्वितचर्वणही केले. आता त्यासाठी हा नवा विषय मिळाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर या मूर्तीचा फोटो एका अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

ही पोस्ट आतापर्यंत 16 हजारांहून जास्त लोकांनी पाहिली आहे. तर यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ही मूर्ती माया सभ्यताच्या काळातील असल्याचा दावा केला जातो. माया संस्कृती 1500 इसवी सन पूर्व काळात मेक्सिको, होंडुरास, ग्वाटेमाला आणि युकाटन प्रायद्वीपमध्ये अस्तित्वात होती. यूजर्स सोशल मीडियावर हा फोटो आणि पोस्ट शेअर करत या दाव्याचे समर्थन करत आहेत. हजारो वर्षांपूर्वी सापडलेली ही एक प्राचीन मूर्ती संशोधनकर्त्यांना सापडली आहे.

Back to top button