Baramati Farmers Pudhari
पुणे

Baramati Farmers Vegetable Prices: शहरात महागाई, पण शेतकऱ्यांच्या पदरात मातीमोल दर

कोथिंबीर-मेथी स्वस्त; चुकीच्या धोरणांमुळे कांदा उत्पादक अडचणीत

पुढारी वृत्तसेवा

दत्ता भोसले

वडगाव निंबाळकर: कधीतरी शेतमालांचे दर वाढले तर शहरातील मध्यमवर्गीय ग््रााहक शेतकऱ्यांबाबत वेगवेगळ्या कमेंट्‌‍स करताना दिसतो. परंतु, शेतकऱ्यांकडील वस्तुस्थिती जाणून घेतली, तर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाल्याचे दिसून येते. इतर शेतकऱ्यांना अनेकदा मातीमोल दरानेच तरकारी विकावी लागते, अशी परिस्थिती आहे.

वर्षातून एखादा-दोनदा मकोथिंबीर जुडी 100 रुपयांनाफ, मकांदा खातोय भाव-ग््रााहकांच्या डोळ्यांत पाणीफ अशा बातम्या झळकतात. त्यामुळे याचा थेट फायदा शेतकऱ्यांनाच होत असल्याचा समज शहरातील लोकांत होता. मात्र, मधल्या व्यापाऱ्याचा त्यात किती फायदा झाला, त्यातून चार-सहा महिने राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात किती रुपये पडले, याबाबत कोणी विचारत नाही. शेतकऱ्यांना वर्षातून क्वचितपणे चांगला दर मिळतो, इतर वेळी मात्र खर्चही निघत नाही. परिणामी, शेतकऱ्यांसाठी तरकारी पीक म्हणजे जुगार खेळण्यासारखा प्रकार झाला आहे, अशी खंत कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील ऊत्पादक विनोद नलावडे व महेश सोमनाथ खोमणे या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

यंदा हे हमखास पैसे मिळवून देणारे चांगले नगदी पीक आहे. त्याच्या जोरावर खूप मोठी आर्थिक उलाढाल शेतकरी कुटुंबात चालू असते. परंतु, सतत सरकारचे धरसोड करणारे आयात-निर्यात धोरण शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. हे धोरण योग्य पद्धतीने राबविले न गेल्याने गेल्या वर्षभरात कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे.

केवळ निर्यात धोरणाच्या चुकीमुळे व शासकीय उदासीनतेमुळे कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडल्याचे मत कांदा उत्पादक प्रमोद ज्ञानदेव खोमणे, राजेंद्र खंडागळे यांनी व्यक्त केले. वर्षापूर्वी चाळीत भरून ठेवलेला त्यांचा कांदा बाजारभाव वाढण्याच्या प्रतीक्षेत आहे. पण, भाव काय वाढताना दिसत नाही आणि जरी वाढला तरी कांदा चाळीत सडलेला असणार हे नक्की.

कोथिंबीर, मेथी मातीमोल

यंदा बारामती तालुक्यात मेपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला होता. तो अगदी ऑक्टोबरपर्यंत कायम होता. परिणामी, शेतजमिनींना वाफसा नव्हता. जिथे शक्य तिथे शेतकऱ्यांनी कोथिंबीर, मेथीसह पालक, चाकवत, शेपूसह अन्य तरकारींची पिके घेतली. त्याला चांगला दरही मिळत होता. परंतु, गेल्या महिनाभरापासून कोथिंबीर दहा रुपयांना एक किंवा दोन जुड्या, तर मेथीसुद्धा दहा ते वीस रुपये जुडीवर आल्याची स्थिती ग््राामीण भागातील आठवडे बाजारात पाहायला मिळत आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी चिंताग््रास्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT