पुणे

पिंपरी : पवना धरणातून विसर्ग सुरू

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे) : पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने धरणाच्या वीज निर्मितीगृहाद्वारे पवना नदीमध्ये सोमवारी (दि.18) रात्री अकरापासून पाण्याचा 1400 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहून पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्याची शक्यता आहे. पात्राच्या पातळीत वाढ होणारअसल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

पवना नदी काठच्या सर्व रहिवाशांना सतर्क करण्यात आले आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदीमधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व इतर साहित्य तसेच, जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील रहिवाशांनी योग्य ती दक्षता घ्यावी. पाटबंधारे विभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT