पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे, पिंपरी शहरासह जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन दस्तांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. डिजिटलायझेशन करण्यापूर्वी सर्व मूळ दस्तांसाठी स्वतंत्र अभिलेख कक्ष करण्यात येणार आहे. त्यासाठी नव्याने कक्ष उभारण्यात आले आहेत. दरम्यान, ब्रिटिशशासनात शहर आणि जिल्ह्यासाठी हवेली 1 आणि 2 ही दोनच कार्यालये अस्तित्वात होती. या दोन्ही कार्यालयांत मिळून सुमारे 8 लाखांहून अधिक दस्त आहेत.
पुणे शहर आणि जिल्ह्यात ब्रिटिशांच्या शासनात मालमत्तेची खरेदी आणि विक्री करण्यासाठी हवेली क्रमांक 1 आणि हवेली क्रमांक 2 अशी दोनच दस्तनोंदणी कार्यालये अस्तित्वात होती. 1930 पासून हळूहळू दस्तनोंदणीचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे हवेली दोन या कार्यालयाची स्वतंत्र निर्मिती करण्यात आले. या दोन्ही कार्यालयातील हस्तलिखित दस्तांची संख्या 8 ते 10 लाखांच्या पुढे असून, हे सर्व दस्त ब्रिटिशकालीन आहेत. एखाद्या नागरिकांस त्यांची अत्यंत दुर्मीळ मालमत्ता पाहावयाची असेल, तर त्यांना या दस्तांचा उपयोग होण्याची शक्यता आहे. सध्या शासकीय छायाचित्र नोंदणी या इमारतीच्या वरच्या भागात (दुसर्या मजल्यावर) नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये हे जुने असलेल्या दस्त व्यवस्थित कक्ष तयार करून ठेवण्यात येणार आहेत.
ब्रिटिश काळ 1930 सालापासून हवेली एक आणि हवेली दोन या दस्तनोंदणी कार्यालयातील 8 ते 10 लाख दस्त आहेत. सध्या या दस्तांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कित्येक दस्तांना वाळवी लागली आहे, तर काही दस्त अत्यंत जीर्ण झाले आहेत. काही दस्त अडगळीत पडले आहेत. तर बहुतांश दस्त एकावर एक रचून ठेवण्यात आले आहेत. ही बाब लक्षात घेऊनच दस्तांसाठी स्वतंत्र कक्ष आणि डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील 1930 पासूनचे असलेले जुने दस्ताचे लवकरच डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. तसेच हे दस्त ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात येणार आहे.
– संतोष हिंगाणे, सह जिल्हा
दुय्यम निबंधक तथा
मुद्रांक जिल्हाधिकारी.
हेही वाचा