खोर: दौंड तालुक्यातील केडगाव-चौफुला-सुपा या राज्य महामार्गावरील देऊळगावगाडा येथील नारायण बेटपाटी चौक परिसरात भरधाव वाहनांमुळे नागरिकांच्या जीविताला सातत्याने धोका निर्माण झाला आहे. वारंवार होणारे अपघात, शालेय विद्यार्थ्यांची जीवघेणी धावपळ आणि पालकांमध्ये वाढत चाललेली भीती लक्षात घेता वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची जोरदार मागणी ग््राामस्थांनी केली आहे. मात्र, वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त ग््राामस्थांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर दि. 29 डिसेंबर रोजी पुणे येथील कार्यकारी अभियंता (प्रकल्प विभाग) कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हे उपोषण देऊळगावगाडा ग््राामपंचायत, सरपंच, ग््राामस्थ तसेच सद्गुरू विद्यालयाचे पालक यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
यासंदर्भातील निवेदन स्वीकारताना कार्यकारी अभियंता प्रशांत पंडित उपस्थित होते. या वेळी सरपंच राजवर्धन जगताप, ग््राामपंचायत सदस्य अजय गवळी, भाऊसाहेब सोनवणे, सुरेश पायगुडे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष नवनाथ मोरे आदी उपस्थित होते.
नारायण बेटपाटी चौक हा परिसर शाळा, वस्ती आणि बाजारपेठेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असून, येथे स्पीडबेकर, रस्ते सुरक्षा चिन्हे, झेबा क्रॉसिंग तसेच पोलिस बंदोबस्त यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे होणे आवश्यक असल्याचे मत ग््राामस्थांनी व्यक्त केले आहे..
अपघात घडल्यानंतर उपाय करण्यापेक्षा आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम मागणी ग््राामस्थांनी केली आहे. मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास आमरण उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव करण्याचा इशाराही देण्यात आला आहे