Murder Pudhari
पुणे

Daund Crime: दौंडमध्ये धक्कादायक घटना; वडिलांकडून 9 वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या

देऊळगाव राजे परिसरात घडलेल्या या अमानुष घटनेने परिसर हादरला असून दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

पुढारी वृत्तसेवा

देऊळगाव राजे: देऊळगाव राजे (ता. दौंड) येथे एका धक्कादायक घटनेत वडिलांनीच आपल्या 9 वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 3 मे 2026 रोजी पहाटे सुमारे 3.15 वाजण्याच्या सुमारास हनुमान वस्ती, काळे वस्ती परिसरात ही घटना घडली. आरोपी शांताराम दुर्योधन चव्हाण (वय 33, व्यवसाय मजुरी) याने त्याची मुलगी अनामिका (वय 9 वर्षे) हिने तिच्या भावाच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याच्या रागातून संतापून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.

आरोपीने लाकूड कापण्याच्या मशीनचा वापर करून मुलीच्या गळ्यावर, डोक्यावर आणि शरीरावर वार करत तिची हत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कपड्यात गुंडाळून घराला आग लावून अर्धवट जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणात आरोपीसोबत असलेल्या चिंगु शिंदबाद भोसले हिने देखील ही घटना कोणालाही सांगू नये असा इशारा देत माहिती लपवून ठेवल्याचा आरोप आहे. या घटनेबाबत निलेश आत्माराम फडणीस (पोलीस शिपाई, दौंड पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून

आरोपी शांताराम चव्हाण व चिंगु भोसले यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 103(1), 238, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले करीत असून, घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT