Purandar Airport Land Scam Plotting: पुरंदर विमानतळ घोषणेनंतर अनधिकृत प्लॉटिंगचा सुळसुळाट

सासवड परिसरात शेतजमिनींचे बेकायदेशीर तुकडे करून ओढे बुजवण्याचे प्रकार वाढले असून गुंतवणूकदारांसमोर मोठा धोका निर्माण झाला
Purndar Land Scam
Purndar Land ScamPudhari
Published on
Updated on

अमृत भांडवलकर

सासवड: आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा होताच पुरंदर तालुक्यात अनधिकृत प्लॉटिंगचे पेव फुटले. यात गावोगावी कायद्यातील पळवाटा शोधत सात-बारावर नोंदी करून अशा प्लॉटिंगचे प्रकार वाढले आहेत. तसेच, नैसर्गिक ओढे व पाण्याचे स्रोत बुजवून प्लॉट विक्री केली जात असल्याचेही समोर येत आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात पर्यावरणासह सामान्य गुंतवणूकदारांनाही मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Purndar Land Scam
Baramati By-Election Result 2026: बारामतीत सुनेत्रा पवारांचा रेकॉर्डब्रेक विजय; तरीही शहरात जल्लोष नाही

पुरंदरमध्ये प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या घोषणेनंतर तालुक्यात जमिनींच्या व्यवहारांना वेग आला. त्याचा फायदा घेत काही बिल्डर व भू-माफियांनी शेतजमिनींचे बेकायदेशीर तुकडे करून गुंठेवारी प्लॉट तयार करण्याचा उद्योग सुरू केला. या प्रक्रियेत महसूल यंत्रणेतील काही घटकांच्या संगनमताने सात-बारावर नोंदी होत असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत.

Purndar Land Scam
Manchar Vegetable Market Prices: मंचर बाजार समितीत लिंबूला 1600 रुपये; तरकारीला विक्रमी दर

सासवड, जेजुरी तसेच बनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, पारगाव, दिवे, झेंडेवाडी, काळेवाडी, सोनोरी, वाघापूर, बोपगाव, भिवरी, सुपे, हिवरे, चांबळी या परिसरात मोठ्या प्रमाणावर जमिनींची खरेदी-विक्री झाली आहे. मात्र, प्लॉट विकसित करताना आवश्यक रस्ते, जलनिस्सारण, वीजपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. दरम्यान, काही प्रभावशाली घटकांच्या सहभागामुळे या प्रकरणांवर कारवाईचा वेग मंदावल्याची भावना व्यक्त होत आहे.

Purndar Land Scam
Rajgad Fort Development Project: राजगड किल्ल्यासाठी 15 कोटींचा विकास प्रस्ताव; ऐतिहासिक वारसा जपण्यावर भर

तसेच एजंटांकडून शेतकऱ्यांच्या अडचणींचा फायदा घेतला गेला. कमी दरात जमीन खरेदी करून त्याच जमिनींचे प्लॉट करून मोठ्या किमतीत विक्री केल्याचे प्रकारही समोर आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, अशा व्यवहारांमध्ये गुंतवणूक करताना नागरिकांनी 7/12 उतारा, मालकी हक्क, झोनिंग आणि टाऊन प्लॅनिंग मंजुरी यांची खात्री करणे आवश्यक आहे. प्रशासनानेही कठोर कारवाईसह जनजागृती वाढवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Purndar Land Scam
Invasive Sucker Mouth Fish: उजनी धरणात ॲमेझॉनचा धोकादायक सकरमाउथ मासा; जैवविविधतेला मोठा धोका

विमानतळ प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय प्रलंबित असताना, अनधिकृत प्लॉटिंग आणि नैसर्गिक स्रोतांचे नुकसान हा गंभीर प्रश्न बनला आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास पर्यावरणीय हानीबरोबरच नागरिकांच्या फसवणुकीत वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news