

मंचर: कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे रविवारी (दि. 3) तरकारी शेतमालाची एकूण 8 हजार 441 डाग इतकी आवक झाली. फरशी पिकाला 10 किलोला 1 हजार 215 रुपये तसेच लिंबूला 10 किलोला 1 हजार 600 रुपये असा उच्चांकी बाजारभाव मिळाला. बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी ही माहिती दिली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आंबेगाव, खेड, जुन्नर, पारनेर व शिरूर या भागांतून मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक होत असते. शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेतमालाचे वजन, बाजारभाव व एकूण रक्कम, याचा एसएमएस लगेच येतो. ही विश्वासार्हता शेतकऱ्यांना असल्याने पाच तालुक्यांतून शेतकरी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात, असे सभापती थोरात, उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.
कंसात डागाची आवक. फरशी (26) 500-1215, लिंबू (5) 500-1600, गवार (356) 50-610, घेवडा (38) 100-600, राजमा (2) 600-700, मिरची (318) 50-570, अघोरा (6) 35-50, आले (6) 150-450, काकडी (991) 15-300,
कारले (125) 50-350, कैरी (645) 20-301, कोबी (290) 30-80, गाजर (52) 20-150, घोसाळी (3) 120-130, चवळी (48) 100-300, टोमॅटो (104) 180-550, ढोबळी मिरची (251) 50-350, तोंडली (60) 100-351, दुधीभोपळा (136) 20-200, दोडका (64) 20-400,
पापडी (1) 280, फ्लॉवर (3270) 10-100, बटाटा (11) 50-70, बीट (1114) 30-260, भेंडी (158) 40-350, मका (53) 50-110, लसूण (2) 900, वांगी (200) 20-350, वालवड (9) 300-400 आणि शेवगा (21) 200 ते 400.