पुणे

आ. नीतेश राणेंवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा : शिवसेना

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचे आयुक्त आणि शहर अभियंत्यांवर खालच्या पातळीवर टीका करणार्‍या भाजप आमदार नीतेश राणे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी केली आहे. राणे यांनी महापालिकेसमोरील आंदोलनादरम्यान महापालिकेच्या अधिकार्‍यांवर खालच्या पातळीवर टीका केली. या टीकेचा निषेध करीत महापालिकेच्या अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी आंदोलन केले. खरेतर शहरातील अनेक वाघांपैकी एका वाघाने पुढे येऊन अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करायला पाहिजे.

प्रसिद्धीसाठी पुणे शहर यांना सॉफ्ट टार्गेट वाटत आहे. मग या नीतेश राणेंची आमदारकी का रद्द करण्यात येऊ नये ? भाजप नेते ना अधिकार्‍यांच्या समर्थनार्थ, ना नीतेश राणे यांच्या समर्थनार्थ पुढे आले. पुण्यातील भाजपचे नेते हे एकतर बिल्डर आहेत, नाहीतर बिल्डरांचे हस्तक आहेत. त्यांना ना अधिकार्‍यांची पडली ना नीतेश राणे यांची. आगामी निवडणुकीत पुणेकर यांना यांची जागा दाखवून देतील, असेही प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT