नारायणगाव : शेवंती फुलांचे बाजारभाव कोसळल्यामुळे फुलशेती करणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. किलोला अवघे 30 रुपये दर मिळत असल्याने फुले तोडणीसाठी घेतलेल्या मजुरांचेही पैसे भागवणे कठीण झाले असून शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
शेवंती हे नेहमीच हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जात असले, तरी यंदा बाजारभाव खालावल्याने शेवंती उत्पादकांचे गणित बिघडले आहे. पांढरी, गुलाबी आणि पिवळी अशा विविध रंगांच्या शेवंतीची मागणी असताना देखील बाजारात भाव मिळत नसल्याची स्थिती आहे.
यातच काळा मावा, पांढरा मावा आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढल्याने औषध फवारणीचा खर्चही वाढला आहे. भाव नसल्यामुळे औषध खर्च करणेही शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे.
‘किमान 80 ते 100 रुपये किलोला भाव मिळाला तरच फुलशेती परवडते,’ असे मत येडगाव (ता. जुन्नर) येथील फूल उत्पादक रामदास भिसे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे रोगकिडीचे प्रमाण वाढले आहे. बाजारभाव घसरले आणि खर्च वाढला, त्यामुळे हे अर्थकारण कसे जुळवायचे, ही मोठीच पंचाईत झाली आहे.’
फिटत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना दिसून येत आहे. परिणामी फुलशेती अडचणीत येऊन ठेपली आहे. किलोला अवघा 30 रुपयांचा दर; उत्पादक शेतकरी नाराज