Vegetables Pudhari
पुणे

Chakan Vegetable Market Prices: चाकण मार्केट यार्डमध्ये भाजीपाल्याची भरघोस आवक; पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ

कांदा, टोमॅटो, मिरचीसह फळभाज्यांची मोठी उलाढाल; बाजार समितीत ७ कोटींचा व्यापार

पुढारी वृत्तसेवा

अविनाश दुधवडे

चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, टोमॅटो, कोबी, हिरवी मिरची व वांग्याची आवक वाढली. फळभाज्यांसह पालेभाज्यांचीही भरपूर आवक होऊन भाव कडाडले. एकूण उलाढाल 7 कोटी रुपये झाली.

कांद्याची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत वाढली. एकूण आवक 6 हजार 500 क्विंटल झाली. कांद्याला कमालभाव 600 ते 1,300 रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक 1,750 क्विंटल झाली. बटाट्याचा कमालभाव 1,300 रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 50 क्विंटल झाली. लसणाला 12 हजार रुपये कमालभाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 340 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे - कांदा-एकूण आवक -6,500 क्विंटल. भाव क्रमांक - 1. 1,300 रुपये, भाव क्रमांक 2. 1,000 रुपये, भाव क्रमांक 3. 600. बटाटा- एकूण आवक- 1,750 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,300 रुपये, भाव क्रमांक 2. 1,000 रुपये, भाव क्रमांक 3. 800 रुपये.

फळभाज्या- एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे:

टोमॅटो- 270 क्विंटल (1,500 ते 2,000), कोबी- 230 क्विंटल (400 ते 600), फ्लॉवर- 205 क्विंटल (800 ते 1,000), वांगी- 76 क्विंटल (1,500 ते 3,000), भेंडी- 56 क्विंटल (2,000 ते 3,000), दोडका- 46 क्विंटल (2,000 ते 4,000), कारली- 52 क्विंटल (2,000 ते 3,000), दुधीभोपळा- 46 क्विंटल (500 ते 1,500), काकडी- 98 क्विंटल (1,000 ते 2,000), फरशी- 20 क्विंटल (10,000 ते 15,000), वालवड- 42 क्विंटल (2,000 ते 4,000), ढोबळी मिरची- 144 क्विंटल (2,000 ते 4,000), चवळी- 32 क्विंटल (2,000 ते 4,000), वाटाणा- 20 क्विंटल (6,000 ते 8,000), शेवगा- 50 क्विंटल (2,000 ते 3,000), गाजर- 160 क्विंटल (1,500 ते 2,500), गवार- 52 क्विंटल (2,000 ते 4,000), आले- 145 क्विंटल ( 2,000 ते 5,000).

पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे:

मेथी-एकूण 9 हजार 650 जुड्या (1,500 ते 2,000 रुपये ), कोथिंबीर- एकूण 17 हजार 500 जुड्या (1,500 ते 2,500 रुपये), शेपू- एकूण 3 हजार 200 जुड्या (700 ते 1,500 रुपये), पालक- एकूण 3 हजार 400 जुड्या (700 ते 1,500 रुपये).

जनावरे: जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 50 जर्सी गायींपैकी 35 गायींची विक्री झाली. (15,000 ते 70,000 रुपये), 60 बैलांपैकी 45 बैलांची विक्री झाली. (10,000 ते 40,000 रुपये), 85 म्हशीं पैकी 68 म्हशींची विक्री झाली. (30,000 ते 80,000 रुपये), 11,500 शेळ्या-मेंढ्यापैकी 10,900 शेळ्यांची विक्री झाली. त्यांना 2,000 रुपयांपासून ते 15,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT