अविनाश दुधवडे
चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये तरकारी मालाची आवक वाढली. भेंडी, दोडका, रताळे, आल्याची आवक मोठ्याप्रमाणात झाली. पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर, मेथी व पालकाची आवक वाढून भावात घसरण झाली. एकूण उलाढाल ५ कोटी ९० लाख रुपये झाली.
कांद्याची एकूण आवक १ हजार २५० क्विंटल झाली. कांद्याला कमाल भाव १,००० ते २,६५० रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक १,६०० क्विंटल झाली. बटाट्याला कमाल भाव १,५०० रुपये मिळाला. लसणाची एकूण आवक ६५ क्विंटल झाली. लसणाचा कमाल भाव १६ हजार रुपयांवर पोहोचला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३७० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २ हजार रुपयांपासून ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा-एकूण आवक- १,२५० क्विंटल. भाव क्रमांक- १. २,६५० रुपये, भाव क्रमांक २. २,००० रुपये, भाव क्रमांक ३. १,००० रु. बटाटा- एकूण आवक- १,६०० क्विंटल. भाव क्रमांक १. १,५०० रुपये, भाव क्रमांक २. १,२०० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रुपये.
फळभाज्या-एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे-टोमॅटो- ३२९ क्विंटल (१,००० ते २,०००), कोबी-१९० क्विंटल (१,००० ते १,८००), फ्लॉवर-२१० क्विंटल (१,००० ते २,०००), वांगी- ८२ क्विंटल (२,००० ते ४,०००), भेंडी- ८५ क्विंटल (२,००० ते ४,०००), दोडका- ६९ क्विंटल (२,००० ते ४,५००), कारली- ७३ क्विंटल (२,५०० ते ३,५००), दुधीभोपळा- ७० क्विंटल (१,००० ते २,०००), काकडी- ९५ क्विंटल (८०० ते २,२००), फरशी-१४ क्विंटल (५,००० ते ७,०००), वालवड-६२ क्विंटल (२,५०० ते ३,५००), ढोबळी मिरची- ५३ क्विंटल (३,००० ते ५,०००), चवळी-४२ क्विंटल (२,५०० ते ४,५००), शेवगा-५३ क्विंटल (३,००० ते ५,०००), गाजर-१८५ क्विंटल (१,५०० ते २,५००), गवार-५८ क्विंटल (४,००० ते ७,०००), आले-१७५ क्विंटल (७,००० ते १२,०००).
पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे-मेथी- एकूण ११ हजार १९५ जुड्या (८०० ते १,३०० रुपये), कोथिंबीर-एकूण २५ हजार ७४५ जुड्या (४०० ते ८०० रुपये), शेपू-एकूण ४ हजार ५८० जुड्या (५०० ते ९०० रुपये), पालक-एकूण ३ हजार ५४५ जुड्या (५०० ते १,००० रुपये).
जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ३२ जर्सी गायींपैकी २६ गायींची विक्री झाली. (१५,००० ते ७०,००० रुपये), ५५ बैलांपैकी ४५ बैलांची विक्री झाली. (१०,००० ते ४०,००० रुपये), १०५ म्हशीं पैकी ८० म्हशींची विक्री झाली. ( ३०,००० ते ८०,००० रुपये), ११,५०० शेळ्या-मेंढ्यांपैकी १०,९०० शेळ्यांची विक्री झाली. त्यांना २,००० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.