अविनाश दुधवडे
चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक स्थिर असून, दर ४,८०० रुपयांवर पोहचले आहेत. दोडका, गवार, रताळी, टोमॅटो, वांगी, वाटाणा, आले आणि हिरव्या मिरचीची विक्रमी आवक झाली. पालेभाज्यांचे भाव तेजीत राहिले आहेत. एकूण उलाढाल ५ कोटी १५ लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १ हजार २५० क्विंटल झाली. कांद्याला कमाल भाव १,८०० ते ४,८०० रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक २,१५० क्विंटल झाली. बटाट्याला कमाल भाव २,००० रुपये मिळाला. लसणाची एकूण आवक ५० क्विंटल झाली. लसणाला कमाल भाव १८ हजार रुपये मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३१५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३ हजार रुपयांपासून ते ४ हजार रुपयांपर्यंत कमाल भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव
कांदा : एकूण आवक १,२५० क्विंटल, भाव क्र. १ : ४,८०० रुपये, भाव क्र. २ : ३,५०० रुपये, भाव क्र. ३ : १,८०० रुपये. बटाटा : एकूण आवक २,१५० क्विंटल, भाव क्र. १ : २,००० रुपये, भाव क्र. २ : १,२०० रुपये, भाव क्र. ३ : ८०० रुपये.
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रति दहा किलोला मिळालेला दर:
टोमॅटोः ३३६ क्विंटल (१,००० ते १,५०० रुपये), कोबीः २३३ क्विंटल (६०० ते ८००), फ्लॉवर- २१५ क्विंटल (१,००० ते १,८००), वांगी- ८२ क्विंटल (१,००० ते २,५००), भेंडी- १०९ क्विंटल (१,५०० ते २,५००), दोडका- ६५ क्विंटल (२,००० ते ३,५००), कारली- ७३ क्विंटल (२,००० ते २,५००), दुधीभोपळा- ४८ क्विंटल (१,००० ते २,०००), काकडी- ८७ क्विंटल (१,५०० ते ३,०००), फरशी- ४२ क्विंटल (२,००० ते ३,०००), वालवड- ७४ क्विंटल (१,५०० ते २,५००), ढोबळी मिरची- १४९ क्विंटल (१,००० ते २,५००)
चवळी- ४८ क्विंटल (२,००० ते ३,०००), शेवगा- ३२ क्विंटल (३,००० ते ४,५००), गाजर- १८० क्विंटल (१,००० ते २,०००), गवार- ६४ क्विंटल (३,००० ते ६,०००), आले- १७५ क्विंटल (७,००० ते १३,०००), रताळी- ६० क्विंटल (४,००० ते ५,५००), वाटाणा- १५५ क्विंटल (४,००० ते ५,०००), भुईमूग शेंगा - १५५ क्विंटल (४,५०० ते ५,५००). चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांना मिळालेला भावः मेथी- आवक १३ हजार ७४५ जुड्या (५०० ते १,५००), कोथिंबीर - आवक ३६ हजार ५४९ (२०० ते ५००), शेपू- आवक ६ हजार ५१५ (४०० ते ७००), पालक- आवक ६ हजार ९७० (३०० ते ५००).
जनावरेः चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ५५ जर्सी गाईंपैकी ४५ गाईंची विक्री झाली. त्यांची १५ ते ७० हजार रुपयांत विक्री झाली. ७५ बैलांपैकी ५५ बैलांची विक्री झाली. त्यांना १० ते ४० हजार रुपये दर मिळाला. १२० म्हशीं पैकी ९० म्हशींची विक्री झाली. त्यांना ३० ते ८० हजार रुपये भाव मिळाला. ६,९५० शेळ्या-मेंढ्यापैकी ६,८०० शेळ्यांची विक्री झाली. त्यांना २ ते १५ हजार रुपयांचा दर मिळाला.