Pune Mandai Metro Station: गणेशोत्सवात मंडई मेट्रो स्थानक बंद नाही; गर्दी नियंत्रणासाठी एकेरी प्रवासाची व्यवस्था

गेट क्रमांक ३ मधून प्रवेश, तर गेट क्रमांक २ मधून बाहेर पडता येणार; भाविकांनी मेट्रो प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
Pune Mandai Metro Station
Pune Mandai Metro StationPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: गणेशोत्सवाच्या काळात मध्यवस्तीतील वाढती गर्दी लक्षात घेता मंडई मेट्रो स्थानक पूर्णपणे बंद करण्यात आल्याची अफवा पसरली होती. मात्र, ही माहिती चुकीची असून भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी महामेट्रोने मंडई स्थानकात ''एकेरी'' प्रवासाची नवी नियमावली लागू केली आहे.

Pune Mandai Metro Station
Maharashtra Single Women Survey: राज्यात ५४ लाख एकल महिलांची प्राथमिक नोंद; सक्षम करण्यासाठी शासनाचे स्वतंत्र धोरण

नवीन नियोजनानुसार, मंडई मेट्रो स्थानकाचे गेट नंबर ३ (लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ) हे फक्त स्थानकात प्रवेश करण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे. तर, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील गेट नंबर २ चा वापर प्रवाशांना स्थानकातून बाहेर पडण्यासाठी करावा लागणार आहे. या बदलामुळे स्थानकातील गर्दीची कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

Pune Mandai Metro Station
Pune MHADA Lottery 2026: म्हाडाच्या ४ हजार ४६२ सदनिकांसाठी सोडत, अर्जासाठी मुदतवाढ; असे आहे सुधारित वेळापत्रक

मेट्रो अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दीचे व्यवस्थापन सुरळीत ठेवण्यासाठी सध्यातरी या नियोजनात कोणताही बदल केला जाणार नाही. गणेशोत्सवासाठी मध्यवस्तीत येणाऱ्या भाविकांनी परतीच्या प्रवासासाठी मुख्यत्वे मंडई स्थानकाचा वापर करावा, असे आवाहनही मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Pune Mandai Metro Station
Pune University Exam Centre Audit: पुणे विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण; मान्यता देण्यापूर्वी महाविद्यालयांची पाहणी

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांचे मेट्रोला प्राधान्य

शनिवार-रविवारच्या सुट्यांमुळे मध्यवस्तीत गणेश दर्शनासाठी भाविकांचा महापूर आला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिक मेट्रो प्रवासाला प्राधान्य देत आहेत. स्थानकावर चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे प्रवासाचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

Pune Mandai Metro Station
Purandar Soybean Crop Loss: पावसाने दडी मारली; उभ्या सोयाबीनवर शेतकऱ्यांनी फिरवला ट्रॅक्टर, पुरंदरमध्ये खरीप संकटात

या नव्या एकेरी व्यवस्थेमुळे भाविकांना गोंधळ न होता अधिक सुरक्षित आणि सोयीस्कररीत्या मेट्रोचा प्रवास करता येत आहे. तसेच, मंडई मेट्रो स्थानकावरील गर्दी नियंत्रणासाठी प्रवाशांनी मेट्रोला सहकार्य करण्यासाठी डेक्कन आणि पुणे महापालिकेच्या मेट्रो स्थानकावर उतरून पायी चालत मध्यवस्तीत प्रवेश करावा, असे आवाहन देखील मेट्रो प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news