

पुणे: देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून गणेश पेठ येथील बाजारात मासळीची आवक होत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून बाजारात होत असलेल्या मागणीनुसार मासळी मागविली जात आहे. बाजारात दाखल होत असेलल्या मासळीमध्ये पापलेट आणि रावसला मोठी मागणी असून, त्यांच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अन्य मासळींसह चिकन, मटण आणि अंड्यांची मागणी व पुरवठा यामध्ये समतोल असल्याने त्यांचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले. गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. २०) खोल समुद्रातील मासळी १५ ते २० टन, खाडीच्या मासळीची २०० ते ३०० किलो आणि नदीच्या मासळीची ४०० ते ५०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून १० ते १५ टन इतकी आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):
पापलेट : कापरी : २०००, मोठे : १५००-१६००, मध्यम : ११००-१३००, लहान : ८००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ६००-७००, सुरमई ४००-७००, रावस : ७००-८५०, घोळ : ७००-८००, करली : ३५०-४००, भिंग : ३००-४००, पाला : १२००-१४००, वाम : पिवळी ६००-८००, काळी : ३००-४५०, ओले बोंबील : १००-१८०.
कोळंबी : लहान : १४०-२८०, मध्यम : ३००-४५०, मोठी : ५००-७५०, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ७५०-८५०, लॉबस्टर : १८००-२०००, मोरी : ३००-४००, मांदेली : १००-१६०, राणीमासा : २४०-२८०, खेकडे : ३००-४००, चिंबोर्या : ६००-७००. खाडीची मासळी - सौंदाळे : २४०-२८०, खापी : २४०-२८०, नगली : ४८०, तांबोशी : ५००-५५०, पालू : ३००-४००, लेपा : २००-३००, बांगडा : २४०-२८०, शेवटे : २५०-३००, बेळुंजी : १२०-१८०, तिसर्या : २५०-३००, खुबे : १२०-१६० तारली : २५०-३००.
नदीतील मासळी : रहू : १५०-१८०, कतला : १८०-२२०, मरळ : ३००-४००, शिवडा : २००-२५०, खवली : २००-२५०, आम्ळी : १२०-१४०, खेकडे : २५०-३५०, वाम : ४००-४५०. मटण : बोकडाचे ८४०, बोलाईचे ८४०, खिमा ८४०, कलेजी ८८०. चिकन २००, लेगपीस २५०, जिवंत कोंबडी १४०, बोनलेस ३००. अंडी : गावरान (शेकडा) ११२० डझन १४०, प्रतिनग १२. इंग्लिश (शेकडा) ६००, डझन ८४, प्रतिनग ७.