अविनाश दुधवडे
चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढूनही भाव स्थिर राहिले. टोमॅटो, कारली, गवार, गाजर, भोपळा व हिरव्या मिरचीची भरपूर आवक झाली. फळभाज्या व पालेभाज्यांचे भाव तेजीत राहिले. एकूण उलाढाल 4 कोटी 60 लाख रुपये झाली.
कांद्याची एकूण आवक 1 हजार 250 क्विंटल झाली. कांद्याला कमालभाव 700 ते 1,600 रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक 1,400 क्विंटल झाली. बटाट्याला कमाल भाव 1,500 रुपये मिळाला. लसणाची एकूण आवक 50 क्विंटल झाली. लसणाला 12 हजार रुपये कमालभाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 310 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 4 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा- एकूण आवक- 1,250 क्विंटल. भाव क्रमांक- 1. 1,600 रुपये, भाव क्रमांक 2. 1,200 रुपये, भाव क्रमांक 3. 700. बटाटा- एकूण आवक- 1,400 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,500 रुपये, भाव क्रमांक 2. 1,200 रुपये, भाव क्रमांक 3. 800 रुपये.
फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे - टोमॅटो - 309 क्विंटल (2,000 ते 2,600), कोबी - 160 क्विंटल (800 ते 1,200), फ्लॉवर - 170 क्विंटल (1,000 ते 1,500), वांगी - 76 क्विंटल (2,000 ते 3,000), भेंडी - 72 क्विंटल (2,500 ते 3,500), दोडका - 48 क्विंटल (4,000 ते 6,000), कारली - 65 क्विंटल (3,000 ते 4,000), दुधीभोपळा - 48 क्विंटल (1,000 ते 2,000), काकडी - 64 क्विंटल (2,000 ते 3,000), फरशी - 16 क्विंटल (7,000 ते 9,000), वालवड - 16 क्विंटल (5,000 ते 8,000), ढोबळी मिरची - 128 क्विंटल (3,000 ते 5,000), चवळी - 34 क्विंटल (2,000 ते 3,000), वाटाणा - 40 क्विंटल (5,000 ते 6,500), शेवगा - 35 क्विंटल (2,000 ते 3,000), गाजर - 170 क्विंटल (1,000 ते 2,000), गवार - 49 क्विंटल (2,500 ते 4,500), आले - 175 क्विंटल (4,500 ते 5,500).
पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- मेथी- एकूण 12 हजार 170 जुड्या (1,000 ते 1,500 रुपये), कोथिंबीर- एकूण 27 हजार 540 जुड्या (700 ते 1,300 रुपये), शेपू- एकूण 3 हजार 70 जुड्या (1,000 ते 1,600 रुपये), पालक- एकूण 4 हजार 260 जुड्या (500 ते 1,000 रुपये).
जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 45 जर्सी गायींपैकी 40 गायींची विक्री झाली. (15,000 ते 70,000 रुपये), 55 बैलांपैकी 52 बैलांची विक्री झाली. (10,000 ते 40,000 रुपये ), 80 म्हशीं पैकी 65 म्हशींची विक्री झाली. (30,000 ते 80,000 रुपये), 9,800 शेळ्या - मेंढ्यापैकी 9,600 शेळ्यांची विक्री झाली. त्यांना 2,000 रुपयांपासून ते 15,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.