अविनाश दुधवडे
चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची, गाजर, कांदा, लसूण व दोडक्याची भरपूर आवक झाली. फळभाज्यांसह पालेभाज्यांची उच्चांकी आवक होऊनही भाव तेजीत राहिले. एकूण उलाढाल 5 कोटी 90 लाख रुपये झाली.
कांद्याची एकूण आवक 4 हजार 250 क्विंटल झाली. कमाल भाव 500 ते 1,000 रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक 1,500 क्विंटल झाली. कमाल भाव 1,300 रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 30 क्विंटल झाली. लसणाला 10 हजार रुपये कमाल भाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 358 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयांपासून 4 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे - कांदा - एकूण आवक - 4,250 क्विंटल. भाव क्रमांक - 1. 1,000 रुपये, भाव क्रमांक 2. 800 रुपये, भाव क्रमांक 3. 500. बटाटा - एकूण आवक - 1,500 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,300 रुपये, भाव क्रमांक 2. 1,000 रुपये, भाव क्रमांक 3. 500 रुपये.
फळभाज्या : एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे ः टोमॅटो- 316 क्विंटल (1,000 ते 1,800), कोबी- 220 क्विंटल (400 ते 600), फ्लॉवर- 195 क्विंटल (600 ते 1,000), वांगी- 89 क्विंटल (1,500 ते 2,500), भेंडी- 86 क्विंटल (1,500 ते 2,500), दोडका- 58 क्विंटल (2,000 ते 3,500), कारली- 68 क्विंटल (2,000 ते 3,000), दुधीभोपळा- 48 क्विंटल (1,000 ते 2,000), काकडी- 95 क्विंटल (1,000 ते 1,600),
फरशी- 26 क्विंटल (3,000 ते 4,000), वालवड- 40 क्विंटल (3,000 ते 4,000), ढोबळी मिरची- 144 क्विंटल (2,000 ते 4,000), चवळी- 44 क्विंटल (1,500 ते 2,500), वाटाणा- 20 क्विंटल (8,000 ते 10,000), शेवगा- 48 क्विंटल (1,500 ते 2,500), गाजर- 100 क्विंटल (1,000 ते 1,500), गवार - 50 क्विंटल (2,000 ते 3,000), आले- 150 क्विंटल (3,000 ते 4,000), ओली भुईमूग शेंग- 35 पोती (3,500 ते 4,500).
पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- मेथी- एकूण 6 हजार 180 जुड्या (1,500 ते 2,500 रुपये), कोथिंबीर- एकूण 13 हजार 790 जुड्या (1,000 ते 2,000 रुपये), शेपू- एकूण 1 हजार 940 जुड्या (1,000 ते 1,500 रुपये), पालक- एकूण 3 हजार 540 जुड्या (500 ते 800 रुपये).
जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 50 जर्सी गायींपैकी 35 गायींची विक्री झाली. (15,000 ते 70,000 रुपये), 60 बैलांपैकी 45 बैलांची विक्री झाली. (10,000 ते 40,000 रुपये.)