Onion Potato Pudhari
पुणे

Chakan Market Rates: चाकण बाजारात मोठी आवक; तरीही भाजीपाला दर कडाडले

कांदा, बटाटा, कैरीसह फळभाज्यांची भरपूर आवक; 5.95 कोटींची उलाढाल

पुढारी वृत्तसेवा

अविनाश दुधवडे

चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, कैरी, लसूण व हिरव्या मिरचीची मोठी आवक झाली. फळभाज्यांसह पालेभाज्यांची भरपूर आवक होऊनही भाव कडाडले. या बाजारात एकूण उलाढाल 5 कोटी 95 लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची 9 हजार क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमाल 500 ते 1,200 रुपये दर मिळाला. बटाट्याची आवक 1,500 क्विंटल होऊन कमाल भाव 1, 300 रुपयांवर स्थिरावला. लसणाची आवक 35 क्विंटल होऊन 10 हजार रुपये कमाल भाव मिळाला. या आठवड्यात बाजारात कैरीची मोठी आवक झाली. हिरव्या मिरचीची आवक 370 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयांपासून 4 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव : कांदा : आवक- 9,000 क्विंटल. भाव क्र. 1- 1,200 रुपये, भाव क्र. 2- 800 रुपये, भाव क्र. 3- 500. बटाटा- आवक 1,500 क्विंटल. भाव क्र. 1- 1,300 रुपये, भाव क्र. 2- 800 रुपये, भाव क्र. 3- 500 रुपये.

फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मिळालेले दर कंसात:

टोमॅटो- 293 क्विंटल (1,000 ते 1,600), कोबी- 195 क्विंटल (400 ते 600), फ्लॉवर- 225 क्विंटल (600 ते 800), वांगी- 82 क्विंटल (1,000 ते 1,500), भेंडी- 84 क्विंटल (1,000 ते 2,500), दोडका- 52 क्विंटल (2 ते 4 हजार), कारली- 56 क्विंटल (2 ते 3 हजार), दुधीभोपळा- 42 क्विंटल (1 ते 2 हजार), काकडी- 115 क्विंटल (1 ते 2 हजार), फरशी- 27 क्विंटल (4 ते 5 हजार), वालवड- 42 क्विंटल (3 ते 5 हजार), ढोबळी मिरची- 152 क्विंटल (3 ते 4 हजार), चवळी- 34 क्विंटल (1,500 ते 2,500), वाटाणा- 21 क्विंटल (7 ते 9 हजार), शेवगा- 38 क्विंटल (1,500 ते 3,000), गाजर- 108 क्विंटल (1,000 ते 1,500), गवार- 42 क्विंटल (2000 ते 3,500), आले- 155 क्विंटल (3 ते 4 हजार), ओली भुईमूग शेंग- 70 पोती (4 ते 5 हजार).

पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व मिळालेला दर : मेथी- एकूण 7 हजार 190 जुड्या (1,500 ते 2,000), कोथिंबीर- एकूण 25 हजार 595 जुड्या (1,000 ते 1,500), शेपू - एकूण 2 हजार 545 जुड्या (800 ते 1,200), पालक- एकूण 5 हजार 190 जुड्या (300 ते 600).

जनावरे ः जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 40 जर्सी गायींपैकी 30 गायींची विक्री झाली. त्यांना 15 ते 70 हजार रुपयांचा दर मिळाला. 80 पैकी 60 बैलांची विक्री झाली. त्यांना 10 ते 40 हजारांचा दर मिळाला. 95 म्हशींपैकी 80 म्हशींची विक्री झाली. त्यांची 30 ते 80 हजार रुपयांत विक्री झाली. 8,500 शेळ्या-मेंढ्यांपैकी 7,200 शेळ्यांची विक्री झाली असून, त्यांना 2 ते 15 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT