पुणे

Maratha Reservation Protest : हडपसर, मांजरी परिसरात साखळी उपोषण

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा हडपसर व परिसरच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी हडपसर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ससाणेनगर येथे साखळी उपोषण चालू आहे. तसेच मांजरी परिसरात सुद्धा अनेक ठिकाणी साखळी उपोषणाला सुरवात झाली आहे. मराठा समाजाला 50 टक्केच्या आत सरसकट ओबीसीमधुन आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी जरांगे पाटील हे दुसर्‍यांदा परत आमरण उपोषण साठी बसलेले आहेत आणि त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. त्यांना समर्थन देण्यासाठी हडपसर आणि परिसरमधील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण चालू केले आहे.

संबंधित बातम्या :

ससाणे नगरमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे प्रवीण हिलगे, अविनाश काळे, प्रदीप तांबे, सागर राजे भोसले, गणेश कुंजीर, अमीत गायकवाड सोबत त्यांचे सहकारी तर मांजरी बुद्रूक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे बाळासाहेब घुले, शंकर घुले, सुमित घुले, नवल कुंजीर, विशाल लहाने आणि सोबत ग्रामस्थ यांनी उपोषण सुरु केले आहे. त्याचबरोबर मांजरी फार्म मध्ये कुणाल मोरे, किशोर धुमाळ, रविराज माने, अक्षय घुले, सनी काळे यांसह सहकारी, तसेच, अण्णासाहेब मगर महाविद्यालय जवळ शिवाजी भाडळे, अजय जाधव, अक्षय भाडळे, कुलदीप यादव, अरुण जाधव, राजू हवालदार यांनी उपोषण सुरु केले आहे. शेवाळवाडीमध्येही अशोक शेवाळे, विक्रम शेवाळे, वसंत शेवाळे, विठ्ठल शेवाळे, बाळासाहेब भंडारी,आणि सोबत त्यांचे सहकारी उपोषणास बसले आहेत.

सकल मराठा समाज मांजरी आणि हडपसरच्या वतीने गुरूवार दि 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आण्णासाहेब मगर महाविद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मांजरी बुद्रूक गावठाण असा कँडल मार्च देखील निघणार आहे. तर शनिवार 4 नोव्हेंबर रोजी ससाणेनगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गाडीतळ बस स्टॉप असाही कँडल मार्च निघणार आहे असल्याची माहिती मराठा मोर्चाचे नेतृत्व करणारे आयोजक संदीप लहाने पाटील यांनी दिली.

SCROLL FOR NEXT