पुणे

पिंपरी : महापालिकेच्या तीन रुग्णालयांस प्रदूषण मंडळाचे प्रमाणपत्र

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या नवीन थेरगाव, नवीन भोसरी आणि आकुर्डीतील हभप प्रभाकर कुटे रुग्णालयांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची परवानगी मिळाली आहे. प्राप्त परवानगीच्या अनुषंगाने बँक गॅरंटीची रक्कम भरण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेसाठी (वायसीएम) कंत्राटी पद्धतीने आवश्यक कर्मचारी उपलब्ध करण्यात येणार आहेत. पालिकेच्या विविध विभागांचे लेखापरीक्षण करण्यासाठी मुख्य लेखापरीक्षण विभागामध्ये कार्यरत 6 सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना नियुक्ती देण्यात आली होती. त्यांना पुन्हा 6 महिने कालावधीसाठी नियुक्ती देण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डन येथे स्थापत्यविषयक सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहे. चिखली प्रभाग क्रमांक एकमधील रस्ते मजबुतीकरण करून डांबरीकरण करण्याच्या कामास मान्यता देण्यात आली. भामा-आसखेड प्रकल्पाअंतर्गत तळवडे-चिखली येथील प्रकल्पास वीजपुरवठा करणे तसेच, पंपहाऊस चालू करणे, रावेत येथील पंपाचे रेट्रोफिटींग करणे या कामासाठी सन 2023-24 अर्थसंकल्पात तरतूद वर्गीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. दुबार विकास हक्क प्रमाणपत्र अदा करण्यासाठी शुल्क लागू करण्यात येणार आहे. त्याला आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT