पुण्यात साकारली माउलींची पाचफुटी मूर्ती

पुण्यात साकारली माउलींची पाचफुटी मूर्ती

पुणे : शालेय जीवनातच वेगवेगळ्या कलात्मक गोष्टी पाहत, वडिलांच्या सुंदर कलात्मक वस्तूंमधून प्रेरणा घेऊन उत्तम मूर्तिकार बनलेल्या विनोद श्रीराम येलारपूरकर यांनी पालख्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांची 5 फुटांची फायबरची मूर्ती साकारून पालख्यांचे स्वागत केले आहे. शाळेत असतानाच वेगवेगळ्या कलात्मक गोष्टी पाहणे, तयार करणे, गणेशमूर्ती तयार करणे, घरच्या घरी कलात्मक पद्धतीने डेकोरेशन करणे, अशा अनेक सृजनात्मकतेला खतपाणी घालणार्‍या गोष्टींकडे त्यांचा कल असायचा.

त्यांचे वडील श्रीराम येलारपूरकर हे सुंदर व कलात्मक आकाशकंदील बनवत असत. तसेच त्यांचे काका शांताराम येलारपूरकर हे देखील विविध कलात्मक वस्तू बनवत असत. नववीमध्ये त्यांनी पहिली शाडू मातीची गणेशमूर्ती तयार केली. कलाक्षेत्रातील उच्च शिक्षण घेतल्यानंतर 2004 सालापासून व्यावसायिक शिल्पकार तसेच मूर्तिकार म्हणून पुण्यामध्ये काम करण्यास त्यांनी सुरुवात केली.

सुमारे दीडशे गणेशमूर्ती मी तयार केलेल्या आहेत. विविध कंपन्यांसाठी क्रिएटिव्ह करंडक, 30 मॉडेल्स, अशा विविध माध्यमांमध्ये काम केलेले आहे. रात्रंदिवस मेहनत करून कलेतून समाजाला आनंद देता येतो.
                                                                         – विनोद येलारपूरकर, शिल्पकार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news