Baramati Career Sansad Pudhari
पुणे

Baramati Career Sansad: शारदाबाई पवार महाविद्यालयात करिअर संसद अधिवेशन; आधुनिक कौशल्यांवर भर

एआय, ड्रोन, कृषी व उद्योजकतेच्या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना मिळाली नवी दिशा

पुढारी वृत्तसेवा

बारामती: ॲग््राीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचालित शारदाबाई पवार महिला आर्ट्‌‍स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शारदानगर, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला होता. या अधिवेशनात व्याख्यानाबरोबर मिलेट प्रोसेसिंग, नर्सरी, हायड्रोपोनिक, व्हेजिटेबल्स,गोट फार्मिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन ट्रेनिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, फिशरी फार्मिंग इत्यादी प्रशिक्षणावर भर देण्यात आला होता.

अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू पराग काळकर यांनी संवाद साधला. ते म्हणाले, करिअर कट्‌‍ट्याने विद्यार्थ्यांना एका निश्चित कक्षेत आणून सोडले आहे. इथून पुढे तुम्ही तुमचा आत्मविश्वास जागा करून विकास करा. तुम्हाला तुमच्या भविष्याची दिशा निश्चित मिळेल. तुम्ही 2047 च्या विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहात. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे वेगाने बदल होत आहेत. तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी काही कौशल्य तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले तरच त्याच्या जवळपास पोहोचाल. तुम्ही तुमच्या करिअरचा प्रवास कसा करणार आहे त्याचे मार्ग शोधा. तेथे जाण्यासाठी तुमच्या स्वभावाला अनुरूप असणाऱ्या गोष्टींचा शोध घ्या. तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट आली की, ती लगेच करा. त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढेल.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे म्हणाले, ‌‘करिअर संसदेचे हे अधिवेशन अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडले. येथे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे जाण्यासाठी निश्चित दिशा या अधिवेशनातून मिळाली आहे. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याने आपल्या करिअरच्या वाटचालीचे नियोजन करावे. या पुढेही विद्यार्थ्यांना काही मदत लागल्यास करिअर संसद कोणत्याही प्रकारची मदत करण्यास तयार आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी यांनीही मनोगत व्यक्त केले. या समारोप सत्राला ॲग््राीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त-सचिव सुनंदा पवार, राज्यस्तरीय करिअर संसद समिती अध्यक्ष, प्राचार्य, डॉ. धनंजय तळवणकर, करियर संसद राज्यस्तरीय समिती, सचिव, सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठ, व्यवस्थापन परिषद सदस्य, प्राचार्य, डॉ. नितीन घोरपडे, करिअर कट्टा समितीचे समन्वयकं प्रा. राजकुमार सुरवसे, करिअर संसदेच्या प्रमुख प्राजक्ता जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

अधिवेशन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, संस्था समन्वयक प्रशांत तनपुरे, संस्थेच्या एचआर हेड गार्गी दत्ता यांचे मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य, डॉ. मोहन निंबाळकर, उपप्राचार्य प्रा. राजकुमार देशमुख, उपप्राचार्य डॉ. परिमीता जाधव, करिअर कट्टा समितीचे समन्वयक प्रा. राजकुमार सुरवसे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. रोहिदास लोहकरे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. आश्लेषा मुंगी यांनी केले. प्रा. डॉ. एस. डी. देशभतार यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT