पुणे

पुणे : अपघातामुळे कारचालकाची बनवेगिरी उघड

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चारचाकी गाडीला बनावट नंबरप्लेट लावून फिरणार्‍या एकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्या गाडीने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. त्यावेळी तो गाडीला बनावट नंबरप्लेट लावून फिरत असल्याचे समोर आले. आपल्या वाहनांवर कारवाई होऊ नये, म्हणून अनेक जण नंबरप्लेटमध्ये आकड्यांची आदलाबदल करून वाहने फिरवत असतात.

लोणी काळभोर पोलिसांनी आदिल सिराज मुलाणी (वय 23, रा. दिवे, ता. पुरंदर) या कारचालकाला अटक केली आहे. या अपघातात श्रीधर धर्मा कदम (वय 33, रा. लोणी गाव) यांचा मृत्यू झाला होता. हा अपघात वडकी रोडवरील दिवांग पार्क फाटा येथे 4 जून रोजी दुपारी 4 वाजता घडला. याबाबत पोलिस शिपाई अमोल मुंढे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिल मुलाणी हा कारचा रजिस्टर नंबर न लावता जाणीवपूर्वक चुकीचा नंबर टाकून ती कार फिरवत होता. फुरसुंगी येथील वडकी रोडवरील दिवांग पार्क फाटा येथे श्रीधर कदम हे रिक्षातून खाली उतरले. त्या वेळी पाठीमागून आदिल मुलाणी हा भरधाव कार घेऊन आला. त्याने कदम यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अपघाताची चौकशी केली़ तेव्हा आदिल हा बनावट नंबर प्लेट लावून कार चालवत असल्याचे आढळून आले. पोलिस उपनिरीक्षक तरटे तपास करीत आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT