पुणे : पालखीनिमित्त पीएमपीकडून जादा बस | पुढारी

पुणे : पालखीनिमित्त पीएमपीकडून जादा बस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपी प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे यंदाही संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त प्रस्थान सोहळ्यासाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीने केले आहे.

आळंदीकरिता 142 बस

भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी दि. 8 पासून 12 तारखेपर्यंत आळंदीकरिता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणांवरून सध्या संचलनात असणार्‍या बसेस व जादा अशा दररोज एकूण 142 बस सोडल्या आहेत.

देहूकरिता 30 ज्यादा बस

देहूकरिता पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून सध्या संचलनात असणार्‍या व जादा अशा एकूण 30 बस पीएमपीकडून सोडण्यात आल्या आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा 12 बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचा

Kolhapur News | कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता, परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे रविवारी प्रस्थान

Back to top button