दहावी निकाल 
पुणे

एसएससी निकाल : दहावीचा निकाल ९९.५५ टक्के, यंदाही मुलींची बाजी 

backup backup

पुणे, पुढारी ऑनलाईन : एसएससी निकाल हा विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनानुसार लागेलला आहे. निकालाचा टक्केवारी ९९.५५ टक्के इतकी आहे. कोकण विभागाचा निकाल १०० टक्के आहे. त्याचबरोबर यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यामध्ये अधिकाऱ्यांनी माहिती दिली. एसएसएसी निकाल यामध्ये ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळालेले आहेत. २२ हजार ३८४ शाळांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ८३ हजार २६२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून जास्त गूण मिळाले आहेत. आज दुपारी १ वाजता एसएससी निकाल ऑनलाईन पद्धतीने लागणार आहेत.

या संकेतस्थळांवर पहा निकाल

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeduction.com

कसा पहाल निकाल?

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वरील संकेतस्थळावर जावं.

त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.

Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.

तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

मूल्यांकन कसं झालं? 

यंदा राज्य शिक्षण विभागानं निकालाच्या गणितासाठी पर्यायी मुल्यांकन निकष लावले आहेत. महाराष्ट्र वर्ग दहावीच्या मूल्यांकन निकषानुसार, वर्ग ९ ची वार्षिक परीक्षा आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यांकन, युनिट टेस्ट आणि प्री-बोर्ड मधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे निकाल मोजला जाईल.

पुणे -दहावी बोर्डाचा आज निकाल,पत्रकार परिषद लाईव्ह

हे वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT