मुख्यमंत्री फडणवीस File Photo
पुणे

BJP landslide Victory Pune: पुणे-पिंपरीत भाजपाचा दणदणीत विजय; ‘हा जनतेच्या विश्वासाचा कौल’ – मुख्यमंत्री फडणवीस

महायुतीच्या विकासकामांवर मोहोर; अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांचे मी आभार मानतो. त्यांनी भाजपावर विश्वास ठेवला आणि खऱ्या अर्थाने लँडस्लाईट विक्टरी ज्याला म्हणतात असा विजय आम्हाला दिला आहे. महायुती सरकारच्या विकासकामांवर ही मोहोर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीतील घटक पक्ष भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात प्रमुख लढत होती. अजित पवार यांनी या दोन्ही शहरात केलेल्या जोरदार प्रचारामुळे येथे चुरशीची लढत होईल अशी शक्यता होती. पण, दोन्ही महानगरपालिकांमध्ये भाजपाने एकहाती वर्चस्व मिळवल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले, त्या सर्व नागरिकांचे मी केवळ आभारच मानत नाही, तर ऋणनिर्देशही करतो. ज्याप्रकारे विजय दिला आहे, त्याचा आनंद तर आहेच, पण जबाबदारीचं भान होतंय. हा विजय म्हणजे जनतेने दाखवलेला विश्वास आहे. म्हणून या विश्वासाला पात्र होण्याकरता आम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. महापौर बनल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही जे व्हिजन मांडलेलं आहे ते प्रत्यक्षात उतरण्याकरता मैदानात उतरणार आहोत.

अपेक्षित केलं नव्हते असं यश...

“या निवडणुकीत बऱ्याच प्रकारचे आडाखे होते, चर्चा होत्या. त्या चर्चांना केवळ विरामच नाही, तर त्या चर्चांच्या विपरीत, कोणीही अपेक्षित केलं नव्हते असं यश मिळालं”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुणेकरांनी भाजपाला स्वीकारलं

पवारांच्या राष्ट्रवादीला जनतेने नाकारलं का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला असता ते म्हणाले, ‌‘मी असं म्हणणार नाही की त्यांना नाकारलं, मी म्हणेन की पुणेकरांनी भाजपाला स्वीकारलं.‌’

अजित पवारांची ‌‘कॅबिनेट‌’ला गैरहजेरी

कालच्या पराभवानंतर दादा (अजित पवार) नाराज आहेत का, असं विचारल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‌‘दादांची माझी परवाच भेटही झाली. वोटिंग झाली तेव्हाही दादा येऊन गेले. त्यांच्याकडे गर्व्हनर येणार आहेत, म्हणून ते कॅबिनेटला येऊ शकणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT