

पुणे : आकाशगंगा देखील एकमेकांचे भक्षण करतात. मलीन-1 नावाची आकाशगंगा इतर आकाशगंगांना गिळंकृत करीत असल्याची निरीक्षणे पुण्यातील आयुकाच्या शास्त्रज्ञांनी टिपली आहेत. मालिन-1, ही खगोलशास्त्रज्ञांना ज्ञात आतापर्यंत सापडलेली सर्वात मोठी सर्पिल आकाशगंगा आहे. तिचे आकारमान आपल्या आकाशगंगेच्या 6 पट जास्त आहे.
ती आपल्यापासून सुमारे एक अब्ज प्रकाशवर्षे दूर स्थित आहे. हीचा प्रकाश फार मंद असल्यामुळे शोध नुकताच लागला आहे. आंतरविद्यापीठ सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्सचे ( आयुका) संशोधक विद्यार्थी मनीष कटारिया यांनी प्रा.डॉ.कनक साहा यांच्या मागदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले.
ती आपल्यापासून सुमारे एक अब्ज प्रकाशवर्षे दूर स्थित आहे. हीचा प्रकाश फार मंद असल्यामुळे शोध नुकताच लागला आहे. आंतरविद्यापीठ सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्सचे ( आयुका) संशोधक विद्यार्थी मनीष कटारिया यांनी प्रा.डॉ.कनक साहा यांच्या मागदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले.
मालीन-1 सारख्या प्रचंड, कमी-पृष्ठ-तेजस्वी आकाशगंगा (दीर्घिका) कशा वाढतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्या प्रचंड, अंधुक रचना दीर्घिका निर्मितीच्या सध्याच्या सिद्धांतांना आव्हान देतात.
मनीष कटारिया,संशोधक विद्यार्था,आयुका
शास्त्रज्ञांना जेव्हा मालीन-1 या आकाशगंगेचा शोध लागला तेव्हा तिच्या शोधापासूनच खगोलशास्त्रज्ञांना कोड्यात टाकले. तिचा मध्यवर्ती भाग, जो अंदाजे आकाशगंगेच्या तारकीय तबकडीच्या आकाराचा आहे. तो एका मसुरीच्या दाण्याच्या आकाराइतका लहान दिसतो आहे. तसेच तिचे मंद तारे तयार करणारे सर्पिल बाहू सुमारे 3 हजार प्रकाश-वर्षांपर्यंत पसरलेले आहेत. मध्यवर्ती भागात अनेक तरुण तारे तयार होणारे पुंजके ओळखले. यापैकी एक, ज्याला सी-1 पुंजका म्हणून ओळखले जाते, तो तुलनेने तेजस्वी अन प्रचंड वस्तुमानाचा आहे. मध्यवर्ती भाग अन्यथा शांत झालेल्या आकाशगंगेसारखा दिसत आहे म्हणजे तारे तयार होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात थांबली आहे, त्यामुळे हा तेजस्वी अतिनील पुंजका गायब झाला.
काही वर्षांपूर्वी मालीन -1 च्या डेटाचे परीक्षण करताना हे समूह पाहिले होते आणि ते बाह्य स्रोताचे असावेत असा अंदाज लावला होता. संशोधकांनी केलेल्या काळजीपूर्वक विश्लेषणामुळे ही कल्पना सिद्ध झाली. मालीन 1 शांतपणे लहान (बटू) दीर्घिकांना गिळंकृत करत आहे. ही प्रक्रिया तिच्या मध्यवर्ती भागात बदल घडवून आणत असल्याचे दिसले.
प्रा.डॉ. कनक साहा,ज्येष्ठ शास्त्रज्ञ,आयुका
अस्ट्रोसॅट या दुर्बिणीच्या सहाय्याने अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपद्वारे मालिन-1 चे निरीक्षण केले आहे. या आकाशगंगेत आपल्या सूर्यासारखी कमी धातू आणि अल्फा-घटकांची विपुलता आहे. एका प्रदीर्घ शांत टप्प्यानंतर, गेल्या 200 दशलक्ष वर्षांमध्ये तारे निर्मितीचा स्फोट झाला असावा. ज्यामुळे धातू-रहित तरुण ताऱ्यांसह अतिनील-चमकदार तारेही तयार झालेले दिसत आहेत.