पुणे

ओतूर : घोणस जातीच्या सर्पाचा महिलेस दंश; लसीच्या तुटवड्यामुळे रुग्णाची हेळसांड

अमृता चौगुले

ओतूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : घराच्या अंगणात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या लहान बाळाला खेळवत असणाऱ्या महिलेस घोणस जातीच्या अतिविषारी सापाने दंश केला. दरम्यान त्या महिलेस ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता तेथे सर्प दंशावरील लस उपलब्ध नसल्याने महिलेस नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले मात्र, तेथेही लस आणि इतर सुविधांचा अभाव असल्याने अखेर महिलेस नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

सहिष्णुता योगेश बोडके ( वय २२ ) रा.खामुंडी असे सर्प दंश झालेल्या महिलेचे नाव आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्याच्या उत्तर पट्ट्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. उकाड्यामुळे विविध विषारी सापांचा मानवी वस्तीत मोठा वावर वाढला आहे. तसेच ग्रामीण भागात वारंवार सर्प दंशाच्या घटना घडू लागल्या आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात प्रथोमोपचार करताना लस मिळणे क्रमप्राप्त असताना लसींचा तुटवडा असल्याचे पाहिला मिळाले.

सर्प दंशानंतर रुग्णास तातडीने उपचार मिळणे गरजेचे आहे. अशा रुग्णास वेळेत उपचार मिळाले नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्प दंश झालेल्या रुग्णास सर्व सुविधा प्राधान्याने प्राप्त करून देण्याची मागणी खामुंडी गावातील नागरिक करत आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT