नगर : चोरलेला पिकअप शोधण्यात यश | पुढारी

नगर : चोरलेला पिकअप शोधण्यात यश

संगमनेर शहर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील गुंजाळवाडी शिवारामध्ये गुजरातच्या पिकअपच्या चालकास अज्ञात चौघा-चोरट्यांनी मारहाण करीत त्याच्या ताब्यातील चार लाखांच्या वाहनासह त्यामध्ये भरलेली यंत्रसामग्री, मोबाईल आणि रोकड असा 6 लाख 5 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेवून पळून गेले. शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्यासह त्यांच्या पथकाने अवघ्या तासा भरातच चोरट्यांनी पळविलेला पिकअप मुद्देमाला सह महामार्गावरील खांडगाव शिवारातील वैदुवाडी येथे पोलिसांना मिळून आला मात्र चारही चोरटे फरार झाले.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर शहरा पासून हाकेच्या अंतरावरती असणार्‍या गुंजाळवाडी शिवारात गुजरात राज्यातील पिकअप चालक लघुशंकेसाठी पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला थांबला होता. त्याचवेळी तोंडाला कापडं बांधून आलेल्या चोरट्यांनी वाहन पळविले.

Back to top button