पुणे

बार्टीच्या अधिकाऱ्यांची लंडन वारी; ग्लोबल भीमजयंतीच्या नावाखाली सहलच

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) कायमच चर्चेत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला जयंती आहे. बार्टीच्या वतीने बाबासाहेबांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते. मात्र, यंदा बार्टीच्या वतीने थेट लंडनमध्ये बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बार्टीने दोन दिवस भीमजयंतीच्या औचित्यांनी आंतरराष्ट्रीय परिषद लंडन येथे ठेवली आहे. यासाठी बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्यासह काही अधिकारीही लंडनला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे बार्टीच्या अधिकार्‍यांची लंडनवारी अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. भीमजयंतीच्या औचित्यांने बार्टीने दोन दिवसाची आंतरराष्ट्रीय परिषद लंडन येथे ठेवली आहे. या परिषदेसाठी खर्च करणार कोण

असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. बार्टी ही सामाजिक संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या उपक्रमासाठी त्यांनी पैसे खर्च करावे ,अशी समाजाची अपेक्षा. मात्र, मागील काही वर्षात विद्यार्थी उपक्रमांवरील खर्चाला कात्री लावली जात आहे, तर दुसरीकडे लंडनला परिषद होत असल्याने आक्षेप घेतला जात आहे. परिषदेच्या नावाखाली अधिकारी लंडनची सहल करणार आहेत काय असाही सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. एकूणच बार्टीच्या या खर्चावर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

गुप्तता का व कशासाठी?

परिषदेला महासंचालकासह काही अधिकारी लंडनला जाणार आहेत. या परिषदेत त्यांचा अजेंडा काय? हा खर्च कुणाच्या निधीतून होणार आहे? यातून काय साध्य करणार आहेत? त्यांनी खर्च तपशील व कार्यक्रमाची माहिती का दिलेली नाही, याची गुप्तता का व कशासाठी? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT