Cyber Fraud Pudhari
पुणे

Baramati WhatsApp Investment Fraud: व्हॉट्सअॅप गुंतवणूक आमिषाला बळी; बारामतीतील दाम्पत्याला 1.30 कोटींचा गंडा

बनावट ट्रेडिंग अॅपच्या जाळ्यात अडकवून मोठी फसवणूक; सायबर गुन्ह्यांची वाढती भीती

पुढारी वृत्तसेवा

बारामती: व्हॉट्‌‍सॲप लिंकद्वारे एक व्हॉट्‌‍सॲप ग््रुाप जॉइन करणे येथील दाम्पत्याला चांगलेच महागात पडले. या ग््रुापमध्ये समाविष्ट झाल्यानंतर बनावट ॲपद्वारे त्यांना मोहजालात अडकविण्यात आले. जादा परताव्याच्या आमिषाने वेगवेगळ्या बॅंक खात्यांवर 1 कोटी 30 लाख रुपयांची रक्कम भरण्यास सांगण्यात आले. ही रक्कम भरल्यानंतर प्रत्यक्षात जादाचा परतावा तर सोडाच; मूळ रकमेवरही पाणी सोडण्याची वेळ या दाम्पत्यावर आली.

याप्रकरणी शहर पोलिसांनी व्हॉट्‌‍सॲप ग््रुापचा ॲडमिन जतिन शर्मा व त्यांना कोणत्या बॅंकेत रक्कम भरायची हे सांगणारा मोबाईलधारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात विवेक अरविंद कुंभोजकर (रा. रामचंद्र मलुकचंदनगर, अशोकनगर, बारामती) यांनी फिर्याद दिली. 2 फेबुवारी ते 18 मार्च या कालावधीत ही घटना घडली.

फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर एक लिंक आली. त्याद्वारे ते एका व्हॉट्‌‍सॲप ग््रुापला जोडले गेले. या माध्यमातून ग््रुापधारकांकडून शेअर मार्केटिंगचे शिक्षण देण्यात येत होते. त्यानंतर ग््रुापवरील सर्व सदस्यांना ॲपची लिंक देण्यात आली. याद्वारे ट्रेडिंग करण्यासाठी सुरुवातीला 50 हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले.

त्यानुसार फिर्यादीने 25 फेबुवारी रोजी बॅंक ऑफ बडोदाच्या कुर्ला, मुंबई येथील एका खात्यावर ही रक्कम भरली. या ग््रुापद्वारे त्यांना कधी कोणते शेअर्स घ्यायचे, कोणते विकायचे, हे सांगितले जात होते. त्यानंतर ट्रेडिंगसाठी रक्कम कमी पडत असल्याचे सांगत येस बँक गुडीवाडा या खात्यावर रक्कम भरण्यास सांगण्यात आले. यासह अन्य बँक खात्यांचा तपशील पुरविण्यात आला.

फिर्यादीने या खात्यांवर एकूण 1 कोटी 30 लाख 2 हजार रुपयांची रक्कम गुंतविल्यावरही कोणताही परतावा देण्यात आला नाही. बनावट ॲपद्वारे ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने 23 मार्च रोजी सायबर हेल्पलाइनद्वारे तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांतही तक्रार देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT