Yedgaon Dam Canal: येडगाव कालव्यात उडी; बेपत्ता दांपत्याचा मृतदेह सापडला

पिंपळवंडी परिसरात दोघांचे मृतदेह आढळले; पाणी बंद केल्यानंतर शोधमोहीम यशस्वी
Yedgaon Dam Canal
Yedgaon Dam CanalPudhari
Published on
Updated on

आळेफाटा: येडगाव धरणाच्या कुकडी डाव्या कालव्याचे वाहत्या पाण्यात सोमवार (दि 30) सायंकाळी काळवाडी परिसरात उडी मारून बेपत्ता झालेल्या उंब्रज (ता जुन्नर) येथील दांपत्याचे मृतदेह बुधवार (दि 1) एप्रिल सकाळी दहा वाजेच्या वेळी कालव्याचे पिंपळवंडीच्या लेंडेस्थळ येथे आढळून आले.

Yedgaon Dam Canal
Pune Crime: आंबेगावात दरोडेखोरांचा धुमाकूळ; शेतकऱ्याची हत्या

अक्षय यशवंत शिंगोटे (वय 30) व प्राजक्ता अक्षय शिंगोटे (वय 27) अशी मृत दांपत्याची नावे आहेत. याबाबत माहिती अशी सोमवार (दि 30) सायंकाळी साडेपाच वाजता अक्षय शिंगोटे पत्नी प्राजक्ता व त्यांचे वर्षाचे लहान मुलासह येडगाव धरणाचे पाणी सोडलेल्या कुकडी डाव्या कालव्याचे धरणापासून एक किलोमीटर अंतरावर काळवाडी परिसरात आले व त्यांनी मुलाला तेथेच सोडत वाहता कालव्यात उडी मारल्या ते या वाहत्या पाण्यात वाहून गेल्याचे तेथील एका प्रत्यक्षदर्शनी पाहिले.

Yedgaon Dam Canal
Ujani Flamingo Decline: उजनीत फ्लेमिंगोची घट; पर्यावरणीय ऱ्हासाचे संकेत

आळेफाटा पोलीस पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर तातडीने ते घटनास्थळी आले मात्र कालव्याचा पाणी जास्त असल्याने शोध घेणे अवघड झाले. याबाबत उंब्रज सरपंच हिरामण शिंगोटे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात संबंधित दांपत्य बेपत्ता झाल्याची खबर दिली. जुन्नर येथील रेस्कु टीम व आळेफाटा पोलिसांनी मंगळवारी दिवसभर या कालव्याचे पारनेर परिसरात जाथ मृतदेहांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही.

Yedgaon Dam Canal
Pune Kondhwa Garbage Problem: कोंढव्यात कचऱ्याचा विळखा; कौसरबाग रस्ता डंपिंग ग्राउंडसारखा

कालव्याचे पाणी कमी करावे याबाबत आळेफाटा पोलिसांनी कुकडी प्रकल्प प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना पत्र दिले. कालव्याचे पाणी बंद करावे यासाठी काळवाडी व उंब्रज नंबर 1 येथील ग्रामस्थांनी काल रात्री आठ वाजता येडगाव धरणावरती जात आंदोलन केले. याची दखल घेत कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी आज सकाळी कालव्याचे पाणी बंद केले.

Yedgaon Dam Canal
Rajarshi Shahu Scholarship UNSW Excluded: राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजनेतून UNSW विद्यापीठ वगळले

दहा वाजेच्या वेळी संबंधित दाम्पत्याचे मृतदेह धरणाचे कालव्यापासून दोन किलोमीटर अंतरावर पिंपळवंडी परिसरातील लेंडेस्थळ येथे रेस्क्यू टीमला आढळून आले. याबाबतचे फिर्याद आळेफाटा पोलीस ठाण्यात देण्यात आली असून आळेफाटा पोलिस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news