बारामती: पावसाने ओढ दिल्याने निरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाले असून, उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने बारामती शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय बारामती नगरपरिषदेने घेतला आहे. गुरुवार (दि. १८) पर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार असून, त्यानंतर दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.
नगरपरिषदेच्या माहितीनुसार, शहरातील पाटस रिंगरोड आणि सायली हिल-जळोची जलशुद्धीकरण केंद्रांवरून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार काही भागांत शुक्रवारी, तर काही भागांत शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पाटस रिंगरोड जलशुद्धीकरण केंद्राच्या कार्यक्षेत्रातील म्हाडा कॉलनी, मुजावरवाडा, देवळे इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, सिद्धार्थनगर, विठ्ठलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस इंदापूर रोड, एसटी स्थानक परिसर, सटवाजीनगर, जवाहरनगर, पोस्ट रोड, हंबीर बोळ, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सिनेमा रोड, विजयनगर, साई-गणेशनगर, आकल्पित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयूरेश्वर अपार्टमेंट, भिगवण रोड, वसंतनगर, अवधूतनगर, व्हील कॉलनी, तपोवन कॉलनी, विवेकानंदनगर, अवचट इस्टेट, ख्रिश्चन कॉलनी, महादेवमळा, सद्गुरुनगर, पतंगशाहनगर, मेडद रोड, क्षत्रियनगर, श्रावण गल्ली, कोष्टी गल्ली, तांदूळवाडी वेस चौक, सिद्धेश्वर गल्ली, महावीर पथ, बुरुड गल्ली, नेवसे रोड, सुभाष चौक, कसाब गल्ली आणि कचेरी रोड परिसरात शुक्रवार (दि. १९) रोजी पाणीपुरवठा होणार नाही.
तर, संपूर्ण कसबा परिसर, फलटण रोड, रेणुकानगर, मुल्लावस्ती, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायणनगर, माळेगाव रोड, हनुमाननगर, माळेगाव कॉलनी, सातववस्ती, शिवाजीनगर, जामदार रोड, कारभारीनगर, सावतामाळी नगर, श्रीरामनगर, चांदणी चौक, पंचशीलनगर, साठेनगर, जगतापमळा, जुना मोरगाव रोड, खंडोबानगर आणि नवीन मोरगाव रोड परिसरात शनिवारी (दि. २०) पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
सायली हिल व जळोची जलशुद्धीकरण केंद्रांवरून पाणीपुरवठा होणाऱ्या रुई, डेरेवस्ती, सायली हिल, सूर्यनगरी, देसाई इस्टेट, अंबिकानगर, जळोची गावठाण, वाबळेवस्ती, तान्हाईनगर, महिला सोसायटी आणि प्रगतीनगर या भागांत शुक्रवारी (दि. १९) पाणीपुरवठा होणार नाही. तर तांदूळवाडी गावठाण, सहयोग सोसायटी, निरा कॅनॉल सोसायटी आणि दूध संघ सोसायटी या भागांत शनिवारी (दि. २०) पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. निरा डावा कालव्यातील पाण्याचा प्रवाह पूर्ववत सुरू होईपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा व्यवस्था कायम राहणार आहे.पंकज भुसे, मुख्याधिकारी