Wagholi Temple Cleanliness Issue: वाघोली वाघेश्वर मंदिर परिसरात कचऱ्याचा ढीग; अंत्यसंस्कारावेळी भाविकांचा संताप

दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे नागरिकांना त्रास; स्वच्छतेच्या दुर्लक्षावर प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली
Wagholi Temple Cleanliness Issue
Wagholi Temple Cleanliness IssuePudhari
Published on
Updated on

वाघोली: वाघोली येथील वाघेश्वर मंदिर परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे शनिवारी (दि.१३ जून) एका मयताच्या नातेवाइकांना दुर्गंधीयुक्त वातावरणात अंत्यसंस्कार करावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवस्थान परिसरात दोन कंटेनर सुका व ओला कचरा टाकण्यात आला होता. तीन दिवसांपासून संबंधित कचरा उचलण्यात न आल्याने भाविकांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

Wagholi Temple Cleanliness Issue
Bibwewadi Census Completion: बिबवेवाडीत घरगणना १००% पूर्ण; जनगणना कामकाज अंतिम टप्प्यात

घटनेची माहिती मिळताच वाघेश्वर देवस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच कचऱ्याचे चित्रीकरण करून संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले. यानंतर अवघ्या काही मिनिटांत कचरा ठेकेदाराकडून परिसरातील कचरा हटविण्यात आला. राजेंद्र सातव पाटील यांनी संबंधित ठेकेदाराच्या कामकाजावर गंभीर आक्षेप घेत यापूर्वीही अशाच प्रकारच्या निष्काळजीपणाबाबत तक्रार केल्याचे सांगितले.

Wagholi Temple Cleanliness Issue
Pune Water Cut Issue: पुण्यात पाणीकपात तीव्र; कमी दाब, अपुरा पुरवठा आणि टँकरवर अवलंबित्व वाढले

दोन वर्षांपूर्वी संबंधित ठेकेदाराविरोधात महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर त्याची बदली केली होती. मात्र, पुन्हा एकदा त्याच ठेकेदाराकडून निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. देवस्थान परिसरातील स्वच्छतेकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे. मंदिर परिसराच्या साफसफाईसाठी पूर्वी पाच महिला कर्मचारी कार्यरत होत्या. सध्या केवळ तीन महिला कर्मचारी काम करत असून, त्या काही तास मंदिर परिसरात स्वच्छता करून इतर ठिकाणी जात असल्याची माहिती प्रतिष्ठानने दिली.

Wagholi Temple Cleanliness Issue
Pune Water Supply Crisis: पाणीटंचाईवरून महापालिका सभेत खडाजंगी; गदारोळात ६० लाख पुणेकरांचा प्रश्न मागे

देवस्थान प्रतिष्ठानने ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता व्यक्त केली असून, या विषयावर संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत चर्चा करून पुढील भूमिका निश्चित केली जाणार असल्याचे अध्यक्ष सातव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित ठेकेदार सुरेश उबाळे यांनी आरोप फेटाळले नसून मी जनगणनेच्या कामात व्यस्त असल्याने कचरा उचलण्यास विलंब झाला. माहिती मिळताच कचरा तत्काळ हटविला असून, यापुढे मंदिर परिसर स्वच्छ राहील, याची काळजी घेतली जाईल, असे स्पष्टीकरण दिले.

Wagholi Temple Cleanliness Issue
Pune Smart Meter Protest: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात काँग्रेसचे आंदोलन; फडणवीस सरकारवर पुण्यात टीकेची झोड

संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कचरा हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भविष्यात मंदिर परिसरात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

आशा राऊत (उपायुक्त, मनपा पुणे)

वाघोलीसह पंचक्रोशीतील वाघेश्वर मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे कचऱ्याचे ढीग साचणे अत्यंत अशोभनीय आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास साचलेला कचरा महापालिका कार्यालयासमोर टाकण्यात येईल.

राजेंद्र सातव पाटील (अध्यक्ष, वाघेश्वर देवस्थान)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news