बारामती: स्वयंपूर्ण महाराष्ट्र (स्मार्ट) योजनेअंतर्गत दारिद्य्ररेषेखालील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील घरांवर अत्यल्प खर्चात एक किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात येणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानामुळे लाभार्थींना अत्यंत कमी हिस्सा भरावा लागणार असून, तब्बल 25 वर्षे मोफत वीज मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेचा पात्र ग््रााहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या बारामती परिमंडलाने केले आहे.
बारामती परिमंडलात आतापर्यंत 1013 अर्ज प्राप्त झाले असून, त्यामध्ये बारामती मंडलातील 195, सातारा मंडलातील 349 आणि सोलापूर मंडलातील 469 अर्जांचा समावेश आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश महिना 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या पाच लाख घरगुती ग््रााहकांना मोफत वीज उपलब्ध करून देणे हा आहे. अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळवण्याची संधीही ग््रााहकांना मिळणार आहे. योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत एक किलोवॅट सौर प्रकल्पासाठी 30 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ‘स्मार्ट’ योजनेत राज्य सरकारकडून अतिरिक्त अनुदान मिळणार असल्याने ग््रााहकांचा आर्थिक भार आणखी कमी होणार आहे. यामुळे दारिद्य्ररेषेखालील ग््रााहकांना फक्त 2 हजार 500 रुपये, सर्वसाधारण आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग््रााहकांना 10 हजार रुपये, तर अनुसूचित जाती-जमातीतील ग््रााहकांना केवळ 5 हजार रुपये हिस्सा भरावा लागणार आहे.
उर्वरित खर्च केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून भागविण्यात येणार असल्याने ग््रााहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ग््रााहकांनी महावितरणच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा किंवा संबंधित शाखा अथवा उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
...असे मिळते अनुदान
दारिद्य्ररेषेखालील लाभार्थींना केंद्र सरकारकडून 30 हजार रुपये, राज्य सरकारकडून 17 हजार 500 रुपये अनुदान मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील, शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग््रााहकांना राज्य सरकारकडून 10 हजार रुपये, तर अनुसूचित जाती-जमातीतील ग््रााहकांना 15 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.